मेष : आज आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. नोकरी – व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल. नवीन मित्र जोडाल. झोपेची तक्रार जाणवेल. तरुण वर्गात अधिक वेळ घालवाल.
वृषभ : आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आज नवे कार्य सुरू करणे उचित ठरणार नाही. चर्चेत आपल्या फसव्या व्यवहारामुळे संघर्ष निर्माण होईल. आर्थिक लाभ होईल. व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. व्यावहारिक कल्पकता वापराल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधवा लागेल. काही बाबी उघडपणे बोलणे टाळाल. अधिकारी व्यक्तींची गाठ घ्यावी लागेल.
मिथुन : स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्रालंकार तसेच मित्र व आप्तांचा सहवास यांमुळे दिवस खूप आनंदात जाईल. दांपत्य जीवनात सुख – समाधान लाभेल. आर्थिक लाभ व नियोजन यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. चांगली संगत लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. मोठ्या लोकांच्या संगतीत वावराल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.
कर्क : द्विधा मनःस्थिती राहिल्याने महत्वाचे निर्णय लांबणीवर टाका. कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकृती बिघडेल. मानसिक ताणापासून दूर राहावे. घरातील वडीलधार्या व्यक्तींचे मत विरोधी वाटू शकते. अंगीभूत कलागुण विकसित होण्यास वाव द्यावा. अति विचार करणे टाळावे. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात.
सिंह : भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील. घरात मंगल कार्ये ठरतील. मित्रांची भेट होईल व त्यांच्यापासून फायदा होईल. व्यापारवृद्धी होईल. जोडीदाराशी विचार-विनिमय कराल. भागीदारीत नवीन योजना आमलात आणाल. मुलांच्या हट्टीपणा कडे लक्ष ठेवा. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
कन्या : पित्या बद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत पुढे जात राहतील. धन, मान – सन्मान वाढेल. सरकार कडून लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. पत्नीची प्रगती होईल. तुमचा जनसंपर्क वाढेल. सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. जुगारातून लाभ संभवतो. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल.
तूळ : नवीन कामे हाती घ्याल. दूरचे प्रवास कराल. परदेशगमनाच्या संधी येतील व परदेशस्थ स्नेह्यांकडून बातम्या मिळतील. प्रकृती यथा तथाच राहील. पत्नीचा वरचष्मा राहील. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. आरोग्यात सुधारणा होईल. जवळचा प्रवास जपून करावा. कामाचा जोम वाढेल.
वृश्चिक : दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे – पिणे सांभाळा. अचानक धनलाभ होईल. अभ्यासासाठी आजचा दिवस चांगला आहे. बोलतांना सारासार विचार करून बोलावे. कसलाही उतावीळपणा करायला जाऊ नये. कौटुंबिक खर्चाचे योग्य नियोजन करावे. घरात नातेवाईक जमा होतील. दिवस हसत-खेळत घालवाल.
धनू : मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात रमून जाल. दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल. रागाचा पारा आवरता घ्यावा लागेल. आततायीपणे वागू नये. कामाचा जोम वाढीस लागेल. काही अनपेक्षित बदल संभवतात. नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे.
मकर : आज व्यापार – व्यवसायात वाढ होईल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी असल्याने आर्थिक देवाण – घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल. सामुदायिक गोष्टीपासून दूर राहावे. स्त्रीवर्गापासून सावधानता बाळगावी. धार्मिक यात्रा कराल. प्रवासात सावधानता बाळगावी लागेल. वादविवादात सामील होणे टाळा.
कुंभ : आज आपण संतती व स्वतःचे स्वास्थ्य ह्या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे ह्याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. तुमच्या संभाषण कौशल्यावर सर्व खुश होतील. व्यावहारिक चातुर्य दाखवून द्याल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. हातातील कला जोपासावी.
मीन : कुटुंबियांशी वाद – विवाद होतील. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनामुळे आपला उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन व कीर्ती ह्यांची हानी होईल. वेळेचे महत्व जाणून वागावे. कोणालाही शब्द देतांना विचार करावा. व्यावसायिक लाभाचे योग्य नियोजन करावे. चटपटीत पदार्थ खाल. आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल. (Today Rashi Bhavishya, 2 March 2023)