मेष : भावांसोबत सुरू असलेले मतभेदही संपुष्टात येतील. आज आपण आपली दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. दुपारनंतर काहींना निरुत्साह जाणवेल. आज तुम्ही एखादे मोठे ध्येय साध्य कराल. प्रवास टाळावेत. मनोबल कमी राहील. दुपारनंतर काहींना मनःस्ताप संभवतो. आज तुम्हाला काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.
वृषभ : तुमचे खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असल्याने तुम्ही थोडे चिंतेत असाल. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. कामे मार्गी लागतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आजचा दिवस आनंदाचा असेल. वाहने सावकाश व जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तुम्ही पैसे घेताना आणि देताना थोडं सावध असलं पाहिजे.
मिथुन : आज तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली तर नक्की करा. दुपारनंतर काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस भरभराटीचा जाईल. महत्त्वाची कामे तसेच दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर अनावश्यक खर्च होणार आहेत. आज तुम्ही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या गोंधळलेले दिसाल.
कर्क : कोणत्याही प्रकारे दिखाऊपणा करू नका आणि जास्त पैसे खर्च करू नका. आरोग्य उत्तम राहणार आहे. काहींचा बौद्धिक प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. आरोग्य उत्तम राहणार आहे. तुमच्या इच्छा आज पूर्ण होतील, अभ्यासात मन लागेल. प्रवास नकोत.
सिंह : तुम्ही तुमच्या व्यावसायिक कामांना गती द्याल. तुम्ही आपली कामे पूर्ण करणार आहात. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. अविवाहित लोकांसाठी चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आत्मविश्वास वाढेल. मनोबल उत्तम राहील. आज ऑफिसच्या कामात तुमचं मन गुंतलेलं असेल.
कन्या : काही दीर्घकालीन योजना सुरू करण्याचा आजचा दिवस असेल. आर्थिक कामाचा ताण कमी होईल. दुपारनंतर काहींना अनपेक्षितपणे नातेवाईक भेटतील.आज तुम्ही आईवडिलांची सेवा कराल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा कमजोर असणार आहे. प्रवासाचे योग संभवतात. चिकाटीने कार्यरत राहाल. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे.
तुळ : आज तुमची आर्थिक स्थितीही मजबूत असेल. दुपारनंतर अनपेक्षितपणे धनलाभ होईल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होणार आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणींपासून दिलासा मिळेल. मनोबल वाढेल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. आज व्यापारी वर्गाने सरकारी नियमांचे उल्लंघन करू नये.
वृश्चिक : कोणत्याही कामात नियम नियमावलीकडे पूर्ण लक्ष द्या. दुपारनंतर तुमचा उत्साह व उमेद वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल चांगले ठेवावे. तुमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. जे सेल्स अँड मार्केटिंगमध्ये काम करतात, ते आज चांगलं कलेक्शन करू शकतील.
धनु : आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. आज काहींची चिडचिड होणार आहे. दुपारनंतर एखाद्या मनःस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या काही योजना गुप्त ठेवाव्या लागतील. दुपारनंतर तुमची कामे रखडण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला राहील.
मकर : तुमचे पैसे वायफळ गोष्टींवर खर्च करू नका. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल जाणार आहे. तुमचा प्रभाव वाढेल. मनोबल उत्तम राहील. कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे टाळावे. महत्त्वाची कामे होतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमच्या कामाची तुलना इतर लोकांच्या कामाशी केली जाऊ शकते, जी तुम्हाला आवडणार नाही.
कुंभ : तुमच्या एखाद्या मित्राकडून भेटवस्तू मिळाल्यास तुमचे मन आनंदित होईल. तुम्ही अधिक जबाबदारीने वागणार आहात. मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. आजचा दिवस त्याग आणि सहकार्याची भावना घेऊन येईल. मानसिक स्वास्थ्य जपावे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होईल. तुमचे सहकारी चांगले काम करत नसतील तर तुमचे त्यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे.
मीन : आज व्यवसायात कोणताही निर्णय घेतल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील. दुपारनंतर काहींचा उत्साह वाढेल. प्रवास होणार आहेत. कामाचा ताण कमी होईल. आज तुम्हाला मिळणारा नफा सामान्यच असेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. दुपारनंतर तुम्हाला मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. तुमच्या कामाचा इतर लोकांच्या कामावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या.