मेष : आज तुम्ही तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण केली पाहिजे. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता दुपारनंतर संपणार आहे. कामाचा ताण कमी होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या व्यवसायातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. उत्साही राहाल. प्रवास सुखकर होतील. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढेल. कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल.
वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा असेल. प्रवासात काळजी घ्यावी लागणार आहे. दुपारनंतर मनोबल कमी राहील. हितशत्रूवर मात करु शकणार आहात. तुम्ही एखाद्याकडून पैसे घेतले असल्यास, ते तुम्हाला परत मागू शकतात. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे आज नकोत. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. नोकरदार लोकांना चांगली बढती मिळेल.
मिथुन : आज तुम्हाला कोणतेही जुने व्यवहार निकाली काढावे लागतील. दुपारनंतर कामाचा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होतील. आनंदी व आशावादी राहाणार आहात. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील.ज्यांना नोकरीची चिंता आहे ते इतरत्र अर्ज करू शकतात. उत्साही राहाल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. नोकरदारांना कामात व्यस्त राहावे लागेल. कामाचे कौतुक होईल.
कर्क : आजचा दिवस तुमच्या सन्मानात वाढ करणारा आहे. काहींचा वेळ व पैसा अनावश्यक कामात खर्च होणार आहे. कामाचे नियोजन चुकणार आहे. मातृपक्षातील लोकांकडून आर्थिक लाभ होताना दिसतो. दैनंदिन कामे मनोबलपूर्वक पूर्ण करावीत. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने चालविताना विशेष दक्षता घ्यावी. बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करु शकतो. नात्यासाठी आजचा दिवस शुभ असेल.
सिंह : नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. बौद्धिक कामगिरी उत्तम होईल. कामे यशस्वी होणार आहेत. दुपारनंतर आनंदी राहाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं, अन्यथा चुका होऊ शकतात. आर्थिक नियोजन योग्य ठरेल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. तुमच्या तब्येतीची कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. व्यवसायात नवीन योजना राबवू शकता.
कन्या : तुम्ही काही धार्मिक कार्यक्रमाचा भाग होऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या पैशाचा काही भाग देखील गुंतवाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी राहाणार आहात. तुमच्या कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. व्यवसायात पैसे कमावण्याचे मार्ग सापडतील. जोडप्यांसाठी आजचा दिवस खास असेल. रोमँटिक डिनर डेटवर जाल.
तूळ : आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणींनी भरलेला असेल. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. तुमच्यामध्ये असणारी चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या भावनांचा आदर करावा लागेल आणि कोणत्याही गोष्टीत घाई करू नका. प्रवास सुखकर होतील. एखादी नवी सुसंधी लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. पैसे कमावण्यासाठी संयम ठेवावा लागेलय प्रियजनांसोबत वेळ घालवू शकता. मनोरंजनावर पैसे खर्च कराल.
वृश्चिक : तुम्ही तुमच्या घरासाठी काही नवीन वस्तू खरेदी करू शकता. आर्थिक कामास अनुकूलता प्राप्त होईल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतात. जोडीदारासोबतच्या नात्यात काही मतभेद असतील तर तेही दूर होईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आनंदी व आशावादी राहाल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभणार आहे. रागामुळे काम बिघडू शकते. वागण्यावर नियंत्रण ठेवा. अतिखर्चामुळे पैशांची कमतरता भासेल. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा.
धनु : आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याचा दिवस असेल. गेले दोन दिवस रखडलेल्या कामात आज सुयश लाभेल. दुपारनंतर मानसिक उद्विग्नता संपेल. खूप दिवसांनी जुन्या मित्राला भेटून तुम्हाला आनंद होईल. कामाचा ताण कमी होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमच्या क्षेत्रात नाव कमावता येईल. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल.
मकर : आजचा दिवस तुमच्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस असेल. दुपारनंतर दैनंदिन कामात काही अनपेक्षित अडचणी जाणवतील. मानसिक त्रास होईल. एखादा मनस्ताप संभवतो. आज तुम्ही तुमची दिनचर्या सुधारू शकाल. इतरांकडून सन्मान मिळाल्यास मन प्रसन्न होईल. वाहने सावकाश चालवावीत. हितशत्रूवर मात कराल. दुपारनंतर काही अनपेक्षित खर्च संभवतात. कामात यश मिळेल. आवडत्या विषयात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले गुण मिळतील.
कुंभ : बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोक काही योजनेत चांगले पैसे गुंतवतील, ज्यामुळे त्यांना भविष्यात चांगले फायदे मिळतील. आनंदी रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर प्रियजन भेटतील. प्रवास सुखकर होतील. प्रवासात तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळेल. प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. संततिसौख्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम फुलेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
मीन : आज तुम्ही तुमच्या मुलांच्या काही वाईट सवयींमुळे चिंतेत असाल. दुपारनंतर विशेष आनंदी राहाल. व्यवसायातील आर्थिक कमाई उत्तम राहील. राजकारणात काम करणाऱ्यांनी आपल्या महिला मैत्रिणींपासून सावध राहावं. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळेल. अतिरिक्त कामामुळे थकवा जाणवेल. काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित करा.