मेष : आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आपल्याला मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज आपण आपल्या घरातील कामांना प्राधान्य देणार आहात. तुमच्या सौम्य बोलण्याने तुमचा मित्र परिवार वाढेल. तुम्ही आशावादीपणाने कार्यरत राहून दैनंदिन कामे पूर्ण करणार आहात. प्रवासाचे सुखकर होतील. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूप खूश असेल.
वृषभ : व्यवसायात भागीदारी करू नका कामाचा ताण कमी होईल. नोकरी, व्यवसायात आपला प्रभाव वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित सुसंधी लाभणार आहे. आज तुमचे एखादे विशेष काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रवासात आनंददायी घटना घडेल. मनोबल उत्तम असणार आहे. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या भागीदारावर विश्वास ठेवा.
मिथुन : आजचा दिवस दूरच्या प्रवासाला जाण्यासाठी अनुकूल आहे. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. गुप्तवार्ता समजणार आहेत. अपेक्षित फोन व पत्रव्यवहार होतील. पूर्वी जर एखादी गुंतवणूक केली असेल तर आज त्यातून तुम्हाला नफा होऊ शकतो.प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुमच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीही सुधारेल.
कर्क : आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आज आपण नियोजलेली सर्व कामे आपण पूर्ण करु शकणार आहात. दुसऱ्यांच्या बाबतीत उगीचच बोलणे टाळावे लागेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहणार आहे. आज तुम्ही तुमचं मन शांत ठेवावं.
सिंह : आजचा दिवस सहलीला जाण्यासाठी उत्तम आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. कामाचा ताण वाढणार आहे. काहींची अनावश्यक पळापळ होणार आहे. मानसिक अस्वास्थ्यामुळे दैनंदिन कामे रखडणार आहेत. गाडी चालवताना सावधता बाळगा नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस थोडा त्रासदायक राहील.
कन्या : तुमचा विस्कळीत झालेला व्यवसाय सावरण्यात दिवसा बराचसा वेळ वाया जाईल. आर्थिक लाभ होणार आहेत. महत्त्वाचे निर्णय आज आपण घेऊ शकणार आहात. काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. आज आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा.
तूळ : आज तुम्ही काही काळ आपल्या मित्र मैत्रिणींच्या सहवासात मौजमजेत घालवाल. दैनंदिन जीवनात आनंददायी घटना घडेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे. आज बऱ्याच कालावधी नंतर एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. आपल्या महत्त्वाच्या कामात आपणाला सुयश लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आजचा दिवस चांगला जाईल. पण आज व्यापारी थोडे उदास दिसू शकतात.
वृश्चिक : भावंडांसोबत काही मतभेद झाले असतील तर आज ते दूर होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्हाला अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. आजचा दिवस उत्तम संपत्तीचे संकेत देणारा आहे. तुम्ही जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून आपल्या दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आज व्यवसायिकांनी थोडं सावध राहावं.
धनु : आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आज आपण वादविवादात सहभाग टाळावा. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. एखाद्या कामासाठी तुम्हाला अचानक प्रवासाला निघावे लागेल. आपल्याला दैनंदिन कामात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रवास आज नकोत. आज तुम्हाला थकवा जाणवू शकतो, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मकर : आजचा दिवस उत्पन्नात वृद्धी घेऊन येणार आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आनंदी रहाल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळाल्याने तुमचे उत्पन्नही पहिल्यापेक्षा जास्त वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. दैनंदिन जीवनात काही सुखद अनुभव येणार आहेत. आज तुमचा व्यवसाय वाढू शकतो, परंतु उत्पादन वाढवताना तुम्ही थोडं गांभीर्य दाखवावं.
कुंभ : पैशांशी संबंधित बाबींमध्ये आजचा दिवस चांगला असणार आहे. कामाचा ताण राहील. आपले मनोबल कमी असणार आहे. मानसिक उद्विग्नता जाणवणार आहे. कोणी काही सांगेल त्याकडे लक्ष देऊ नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन आज नको. वाहने सावकाश चालवावित. जमीन आणि इमारती खरेदी-विक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांना आज तोटा होऊ शकतो.
मीन : आजचा दिवस आनंद घेऊन येणारा आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज आपण महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात. कुटुंबीयांसोबत सहलीला जाण्याची योजना आखाल. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहात. काहींना विविध लाभ होणार आहेत. आज दिवसाच्या सुरुवातीला काही आव्हानांना सामोरं जावं लागेल.