मेष : मनासारखे काम करता येईल. मानसिक उद्विग्नता वाढेल. कामाचा ताण वाढेल. मनोबल कमी असल्याने कामे रखडणार आहेत. कौटुंबिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. घराची स्वच्छता ठेवाल. प्रवासात काळजी घ्यावी. आज बसून राहण्यापेक्षा उत्पन्न वाढेल अशी कामे हाती घ्यावीत. वैवाहिक जीवनात रंग भरतील.
वृषभ : विरोधाला विरोध करू नका. आर्थिक कामात सुयश लाभेल. आज आपले बौध्दिक व वैचारिक परिवर्तन होईल. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. अचानक धनलाभ संभवतो. कामाचा ताण कमी होईल. दिवसाच्या सुरुवातीला दमछाक होईल, पण नंतर-नंतर चांगले परिणाम मिळतील. काही लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
मिथुन : कौटुंबिक क्षण आनंदात जातील. सार्वजनिक कार्यात सहभाग वाढणार आहे. प्रतिष्ठा व मानसन्मान लाभेल. काहींना प्रवासात विविध लाभ होतील. गैरसमजाला खतपाणी घालू नका. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुम्ही आज तुमच्या जोडीदारासोबत आरामात आणि प्रसन्न असाल, पण त्यामुळे कामावरील लक्ष विचलित होऊ शकते.
कर्क : आपली उत्तम छाप पडेल. कार्यक्षेत्र व्यापक होईल. कामाचा ताण कमी होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. जिद्दीने कार्यरत राहाल. कामातून समाधान लाभेल. चिकाटी वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. रोमान्सच्या दृष्टीने टाकलेले पाऊल काही परिणाम दाखवणार नाही. नवीन ग्राहकांशी बोलायला दिवस चांगला आहे.
सिंह : नामस्मरण करण्यात वेळ घालवावा. मानसिक अस्वस्थता राहील. काहींना एखाद्या बाबतीत मनस्ताप संभवतो. आज आपण कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नये, अतिताण घेऊ नये. कामातील विलंब दूर करण्याचा प्रयत्न करा. प्रवास नकोत. आज कामच्या ठिकाणी जास्त बोलू नये, अन्यथा त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होईल. व्यापाऱ्यांना एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून नुकसान होऊ शकते.
कन्या : मनातील इच्छेला प्राधान्य द्याल. प्रवास सुखकर होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. सकारात्मकपणे कार्यरत राहाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. भावंडांचा विरोध जाणवेल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. व्यवसायात कोणी तरी धोका देईल, आणि कान आणि डोळे उघडे ठेवा. दिवस चांगला होण्यासाठी तुम्हाला आज तुम्हाला स्वतःसाठी वेळे देणे शिकले पाहिजे.
तुळ : आशावादी विचार मांडाल. आरोग्य जपावे लागणार आहे. काहींना अनपेक्षितपणे एखादी समस्या जाणवेल. कामाचा ताण वाटेल. काहींना नैराश्य जाणवणार आहे. घरात तुमचे प्रभुत्व राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. अडचणींना हसून दूर करणे किंवा त्यात अडकत जाणे दोन्ही तुमच्या हातात आहे. आज संततीमुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : व्यापारी वर्गाला चांगला फायदा होईल. काहींना विविध लाभ होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व उत्साही राहणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रवास होणार आहेत. तुम्हाला लाभांश, कमिशन, किंवा रॉयल्टी यातून लाभ मिळेल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला खुश कऱण्याचे प्रयत्न करेल.
धनु : रेस,जुगार यातून लाभ संभवतो. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आज आपण अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहात. अचानक धनलाभाची शक्यता. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमची कठोर भूमिका मित्रांसाठी अडचणी निर्माण करू शकते. तसेच पैसे परत दिल्याने तुम्ही आर्थिक अडचणीत याल, त्यामुळे तुम्ही आज उधार घेण्यापासून दूर राहा.
मकर : जोडीदाराचा प्रेमळपणा वाढीस लागेल. जिद्द वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काहींना नातेवाईक भेटणार आहेत. अनपेक्षितपणे एखादा प्रवास संभवतो. उत्तम भागीदार मिळेल.प्रवास सुखकर होणार आहेत. तुम्हाला पैशांचे महत्त्व चांगल्यापैकी माहिती आहे, त्यामुळे तुम्ही सांभाळून ठेवलेले पैसे आज तुमच्या उपयोगाला पडतील.
कुंभ : चांगल्या लोकांचा सहवास लाभेल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. सकारात्मक पणे कार्यरत राहणार आहात. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण होतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. विष्यात किमती वाढण्याची शक्यता असलेल्या वस्तू खरेदी केल्याने लाभ होईल. घरातील वातावरणात आज सकारात्मक बदल कराल.
मीन : घरातील लोकांची उत्तम साथ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. कामाचा आनंद घ्याल. वैद्यकीय व्यवसायातील लोकांना चांगला लाभ होईल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. जोडीदार तुमची मदत करेल. कुटुंबीय आणि मित्रांसाठी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुमचे मन अस्वस्थ होईल.