मेष : आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. महत्त्वाच्या गाठीभेटी घेऊ शकाल. व्यावसायिकांसाठी आजचा काळ कठीण असेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील. सौख्य लाभेल. आज णत्याही कामात बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नका.
वृषभ : आजचा दिवस चांगला जाईल. दुपारनंतरचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे. मानसिक अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. व्यावसायिकांनी नियमांचं पालन करुन काम करावं, सर्व कायदे लक्षात घेऊन व्यवसाय वाढवावा. खर्चाचे प्रमाण कमी होणार आहे. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन : आजचा दिवस थोडी सावधगिरी बाळगण्याचा आहे. स्वास्थ्य कमी राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल. दुपारनंतर अनावश्यक खर्च संभवतात. आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असेल. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाच्या गाठीभेटी नकोत. नोकरी करणाऱ्यांना एखाद्या जुन्या चुकीमुळे ओरडा खावा लागण्याची शक्यता आहे.
कर्क : आजचा दिवस चांगला जाईल. उत्साही व आनंदी राहणार आहात. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर नाराज होऊ शकतात. आर्थिक कामे मार्गी लागतील मनोबल व आत्मविश्वास वाढेल. बौद्धिक प्रभाव राहील. आज एखाद्या कामासाठी अचानक धावपळ करावी लागू शकते.
सिंह : आजचा दिवस चांगला जाईल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. कामे मार्गी लागतील. आज व्यापाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चांगलं वागावं लागेल. हितशत्रुवर मात करू शकाल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे. व्यवसायात कोणताही करार विचारपूर्वक करा. तुमची विश्वासार्हता आणि आदर वाढेल.
कन्या : आज व्यावसायिकांनी आपल्या पैशाच्या व्यवहाराबाबत थोडं सावध रहावं लागेल. मनोबल कमी असणार आहे. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. आज एखादा ग्राहक पैशांबाबत तुमची फसवणूक करू शकतो. प्रवास शक्यतो टाळावेत. वादविवादात सहभाग नको. कामाचा ताण व दगदग राहणार आहे. व्यवसायातील मंदीमुळे तुम्ही त्रस्त असाल तर कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेऊ शकता.
तुळ : आजचा दिवस चांगला जाईल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. व्यापारी वर्गाने आज कोणत्याही प्रकारचं कर्ज घेणं टाळावं. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दुपारनंतर काहींना अडचणींचा सामना करावा लागेल. प्रवासात काळजी घ्यावी. विनाकारण कोणाशीही बोलणे टाळावे.
वृश्चिक : आज तुम्हाला ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. अस्वस्थता कमी होईल. दुपारनंतर आजचा दिवस तुम्हाला अनुकूल असणार आहे. कामे मार्गी लावू शकाल. , इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे व्यापारी आज चांगली सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतात. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रसन्नता लाभेल. आज कायद्याशी संबंधित एखाद्या प्रकरणात तुम्हाला विजय मिळू शकेल.
धनु : प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा काळ चांगला असेल. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मनाबेल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. दुपारनंतर काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. अतिरिक्त कामे करावी लागतील. आज तुमच्या मनातील घालमेली विषयी तुमच्या वडिलांशी चर्चा करू शकता.
मकर : आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी पडतील. आनंदी व आशावादी राहाल. प्रसन्नता लाभेल. आज तुम्ही कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नये. चिकाटी वाढेल. प्रियजन भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. विविध लाभ होतील. आज तुम्हाला तुमच्या मित्राकडून काही मौल्यवान वस्तू भेट म्हणून मिळू शकते.
कुंभ : व्यावसायिकाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. जिद्दीने कार्यरत राहाल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत स्वास्थ्यकर असणार आहे. प्रवास सुखकर होतील. आज कायद्याशी संबंधित काही बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल.
मीन : विद्यार्थ्यांनी आज त्यांच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं. चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. आज तुमचा व्यावसायिक भागीदार तुम्हाला फसवू शकतो. अस्वस्थता कमी होईल. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. काहींना गुप्त वार्ता समजतील. आज तुम्हाला तुमच्या मुलांची संगत कोणाशी आहे याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.