मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुमच्या मनाविरुद्ध घटनेला तुम्हाला सामोरे जावे लागेल. मानसिक चिता राहील. वादविवादात सहभाग टाळावा. संध्याकाळी सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. प्रेम जीवनात दूरावा येईल. प्रवास आज नकोत. दैनंदिन कामात अडचणी येणार आहेत. आत्मविश्वासाचा अभाव राहील.कुटुंबातील मुलाला बाहेरून नोकरीची ऑफर मिळाल्याने कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी त्रासदायक असेल. आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. कामात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भागीदारी व्यवहारात सुयश लाभणार आहे. प्रभाव वाढेल. मनोबल उत्तम असणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्पन्न वाढवण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा असेल.
मिथुन : आजचा दिवस चांगला असणार आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. मानसिक अस्वस्थता राहील. कामात मोठे यश मिळेल. ज्यामुळे तुमचा दिवस आनंदी जाईल. आर्थिक कामे आज नकोत. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. दानधर्म कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. तुम्हाला कोणतेही जुने व्यवहार निकाली काढावे लागतील.
कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नसेल. स्वत:वर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. जुने मित्रमैत्रिणी भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. काम करताना सावधगिरी बाळगा. अनेकांशी सुसंवाद साधाल. सहर्कायांचे सहकार्य लाभेल. लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या मनमानी वागणुकीमुळे तुम्ही त्रस्त राहाल.
सिंह : तुमच्या समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. प्रवासाचे योग सफल होतील. आनंददायी घटना घडेल. मित्र आमि कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. उत्साह व उमेद वाढणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील.
कन्या : आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. कामात खूप व्यस्त असाल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. प्रसिद्धीचे योग येतील. भावंडांबरोबर सुसंवाद राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. तुमच्या वरिष्ठ सदस्यांनी काही सल्ला दिल्यास, तुम्ही त्याची अंमलबजावणी केलीच पाहिजे.
तुळ : कामात यश मिळेल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. दैनंदिन आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल. खर्चात वाढ होऊ शकते. तुम्हाला पैशांची कमतरता भासेल. कामाचा ताण कमी असणार आहे. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. अनेक बाबतीत समाधान लाभेल. एखादी गुप्तवार्ता समजेल. आज तुम्हाला वाहनं जपून वापरावी लागतील, अन्यथा त्यात काही बिघाड होऊ शकतो.
वृश्चक : आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण असेल. रोजच्या कामात सावध राहा. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. महत्त्वाची कामे होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. प्रवास सुखकर होतील. तुमचा एखादा मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला येऊ शकतो. तुम्ही तुमच्या घरात काही बदल कराल.
धनु : उत्पन्नाचे स्त्रोत वाढेल. कामाचा ताण व दगदग राहील मात्र कामामध्ये लक्ष लागणार नाही. मानसिक संभ्रमावस्थता राहण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित मोठा व्यवहार होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. वादविवादात सहभाग टाळावा. जोडीदाराला भेटवस्तू द्याल. नवीन नात्यात लवकर अडकाल. चिकाटीने कामे पूर्ण करावी लागतील. कुटुंबातील लोकांना एकत्र ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमची काही कामं आज अपूर्ण राहू शकतात.
मकर : तुम्हाला कामात यश मिळेल. स्वप्न पूर्ण होतील. आर्थिक लाभ होणार आहेत. चिकाटी वाढेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. करिअरसाठी आजचा दिवस शुभ असेल. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात नाव कमावण्याची संधी मिळेल. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढेल. आजचा दिवस तुमच्या महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस असेल.
कुंभ : आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. आपले तेच खरे कराल. मनोरंजनावर पैसे खर्च कराल. अधिकार लाभेल. प्रवासास दिवस अनुकूल आहे. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी कठोर आणि परिश्रमपूर्वक काम करण्याचा दिवस असेल. बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोक काही योजनेत चांगले पैसे गुंतवतील, ज्यामुळे त्यांना भविष्यात चांगले फायदे मिळतील.
मीन : कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. चिकाटी वाढेल. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कामाचे कौतुक होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. कामाचा ताण कमी होईल. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या काही वाईट सवयींमुळे चिंतेत असाल, ज्यामुळे तुम्हाला त्यांची निंदा करावी लागेल.












