मेष : पाहुण्याच्या येण्याने तुमचा खर्च वाढू शकतो. मानसिक अस्वस्थता राहील. आज तुम्हाला एखादी चिंता सतावेल. मानसिक त्रास संभवतो. काही अनावश्यक खर्च करावे लागतील. कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वागत करण्यात व्यस्त असतील. महत्त्वाची कामे आज रखडणार आहेत. मनोबल कमी राहील. व्यापारी वर्गाने खूप मेहनत केली तर ते डील मिळवू शकतात ज्यासाठी ते बरेच दिवस प्रयत्न करत होते.
वृषभ : कामाच्या ठिकाणी मोठ्या व्यक्तीचा सल्ला प्रभावी ठरेल. ज्यामुळे व्यवसायात प्रगती होईल. काहींना विविध लाभ होणार आहेत. आज आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. नवीन परिचय होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. मित्रांसोबत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी काम करताना थोडा गोंधळ होईल. तुमच्या वरिष्ठांचा सल्ला घ्या.
मिथुन : जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमघ्ये वाद होऊ शकतात. ते टाळण्याचा प्रयत्न करा. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक कामात सुयश लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मुलांच्या बाजूने सकारात्मक गोष्टी घडतील. कामाचा व्याप कमी राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. जे लोक आपला वडिलोपार्जित व्यवसाय चालवतात त्यांनी आपल्या वडिलांच्या सल्ल्यानेच पुढे जावे.
कर्क : कला-क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे अडथळे दूर होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना कामात अनुकूलता लाभेल. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. वडिलांचा सल्ला तुम्हाला कार्यक्षेत्रात फायदेशीर ठरेल. रखडलेली व दैनंदिन कामे आज तुम्ही पुर्ण करू शकणार आहात. काम करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर जे बँकिंग क्षेत्राशी निगडीत आहेत ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या पदोन्नतीबद्दल बोलू शकतात.
सिंह : आज धैर्याने आणि संयमाने काम करा. घाई केल्याने नुकसान होऊ शकते. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. आज एखाद्या घटनेत मनस्ताप संभवतो. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी. कोणताही ताण घेऊ नये. व्यवसायात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.च भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर तुमच्या पार्टनरच्या सल्ल्याशिवाय कोणतेही काम करू नका.
कन्या : व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामे होतील. आज आपण विशेष उत्साही व आनंदी राहणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. कामाचा उरक राहील. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तणावपूर्ण स्थिती असेल. वैवाहिक जीवनात आनंदी व आशावादी रहाल. तुमच्या कामावर तुम्हाला अपेक्षित यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.
तुळ : मुलांच्या यशाची बातमी ऐकून तुमचे मन आनंदाने भरुन जाईल. कुटुंबात काही शुभ घटना घडतील. काही अनावश्यक खर्च करावे लागतील. मानसिक त्रास होईल. आज संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. हितशत्रूवर मात कराल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. कामाचा ताण राहील. जे त्यांचे वडिलोपार्जित व्यवसाय चालवतात त्यांना अधिक फायदा होऊ शकतो.
वृश्चिक : व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. ज्यामुळे भविष्यात व्यवसायाला नवीन गती मिळेल. संततीसौख्य लाभेल. प्रियजन भेटणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज वडिलांना ऑफिस किंवा बिझनेसच्या कामात मदत कराल. आरोग्य सुधारेल. नवीन परिचय होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामाकडे नीट लक्ष द्या. आज तुमच्या हातून काही चूक घडू शकते.
धनु : सावध राहून रागावर नियंत्रण ठेवा. मुलांकडून काही उत्साहवर्धक बातम्या ऐकायला मिळतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे. वडिलांची तब्येत बिघडू शकते. काळजी घ्या. आरोग्य उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल. ज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, टेन्शन फ्री होण्यासाठी मॉर्निंग वॉक, योगा करा.
मकर : आज तुम्हाला नोकरीची कोणतीही ऑफर आली तर ती स्विकारा. जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवीन संपर्क तयार कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुम्ही जर सॉफ्टवेअर इंजिनियर असाल तर तुमच्यावर आज कामाचा बोजा खूप असू शकतो, ज्यामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवेल.
कुंभ : खूप दिवसांपासून रखडलेले काम आज पूर्ण होईल. घरातील सदस्य आज आनंदी असतील. आर्थिक कामात सुयश लाभेल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. आरोग्याची आज काळजी घ्यावी लागेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर काही गैरसमजामुळे तुमच्या व्यवसायातील भागीदाराशी तुमचं नातं बिघडू शकतं.
मीन : व्यवसायात आज नवीन उपकरणे वापरल्याने तुम्हाला फायदा होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. विद्यार्थ्यांना मित्रांच्या मदतीने काम करण्याची संधी मिळेल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. व्यवसाय सामान्य असेल, ज्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका, हळूहळू तुमचा व्यवसाय चांगला प्रगती करेल.
 
	    	
 














