मेष : व्यवसायात लाभ मिळतील. प्रेमात भावनिकता टाळा, करिअरला प्राधान्य द्या. काहींना विविध लाभ होणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. आरोग्य चांगले राहील. तुमचे मनोबल आज उत्तम असल्याने आज आपण अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. अनेकांचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. आज शेजार पाजारच्या लोकांच्या वादात नाहक अडकू नका.
वृषभ : कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून सहयोग मिळेल. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी होणार आहात. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. राग आवरा वाणीवर संयम ठेवा. काही रखडलेली कामे पूर्ण कराल. कामाचा ताण कमी करणार आहात. प्रवासाचे योग येणार आहेत. आनंददायी घटना घडेल. कुटुंबात सुरू असलेला कलह तुम्हाला संवादातून सोडवावा लागेल.
मिथुन : पद बदल हवा असेल तर आजच प्रयत्न करणे चांगले राहील. तुमच्या मतांवर तुम्ही ठाम राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होईल. लव्ह लाईफ बद्दल चिंता राहील.द्विधा मनस्थिती निर्माण होईल. काहींना भाग्यकारक अनुभव येणार आहेत. प्रवासाचे योग येणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आजचा दिवस जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा दिवस असेल.
कर्क : करिअरमध्ये यश मिळेल.कामात काही नवीन काम करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहाल. कामाचा ताण राहणार आहे. कामामध्ये लक्ष लागणार नाही. निरुत्साही राहणार आहात. विद्यार्थी तणावाखाली राहतील. आपण आज महत्त्वाच्या कामाचे नियोजन करण्याचे टाळावे. अकारण मनःस्ताप होणार आहे. विलंब अनुभवाल. तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गांनी उत्पन्न मिळत असल्याचे दिसते.
सिंह : वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत मिळेल. तुम्ही आपल्या मतांवर ठाम राहणार आहात. नोकरीत आनंदी राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. मानसिक ताण-तणाव कमी होणार आहेत. पेपर वर्क नीट करा. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार आहे. प्रवास होणार आहेत. व्यावसायिक लोकांचा एखादा करार पूर्ण झाल्याने आनंदी होतील आणि तुम्हाला एकामागून एक चांगली बातमी ऐकायला मिळू शकेल.
कन्या : आज रखडलेल्या पैशाच्या आगमनाने तुमचे मन प्रसन्न होईल. तुमच्या मनामध्ये आज नकारात्मक विचार राहतील. नवीन प्रकल्पाच्या कामात यश मिळेल. आपण मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिताण घेऊ नये. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. व्यवसायात काहीसा तणाव असेल. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागेल. कोणाच्याही बोलण्याने प्रभावित होऊन कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल.
तुळ : कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाचा वेळ यात समतोल साधावा लागेल. संततीसौख्य लाभेल. तुम्ही आज अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आज प्रवासामुळे तुमचे मन रोमांच आणि तणावापासून मुक्त राहील. आरोग्याच्या तक्रारी आज कमी असणार आहेत. आज तुम्ही आनंदी असणार आहात. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. आजचा दिवस काही गुंतागुंतीच्या समस्यांनी भरलेला असणार आहे. प्रेम जीवनातील लोक त्यांच्या जोडीदाराच्या वागण्याने वैतागून जातील.
वृश्चिक : आज व्यवसायात नफा होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. दैनंदिन कामास विलंब लगला तरी कामे पूर्ण होणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळाल्याने मन प्रसन्न आणि उर्जाने भरलेले राहील. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आज आपण अनेकांना सहकार्य करणार आहात. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही जवळच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
धनु : व्यवसायात एकाच वेळी अनेक कामे हाती घ्याल. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. नोकरीमध्ये तुमच्यावर सोपवलेल्या कामांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. काहींना नातेवाईक भेटतील. त्यांच्याशी सुसंवाद साधाल. भाग्यकारक अनुभव येतील. करिअरमध्ये यशस्वी व्हाल. कोणतेही काम केवळ दिखाव्यासाठी करू नका, नाहीतर तुमच्याकडून चूक होऊ शकते.
मकर : अभ्यासाचे दडपण आणि तणाव टाळा. काहींना अचानक धनलाभ होणार आहेत. आर्थिक व्यवहारात आज तुम्हाला फायदा होणार आहे. नोकरीबाबत तणाव संभवतो. तुम्ही आपली कौटुंबिक कामे आज मार्गी लावणार आहात. स्वास्थ्य व समाधान लाभेल. तरुणांनी लव्ह लाईफ आणि अभ्यास यांच्यात समतोल साधला पाहिजे. तुम्ही कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, नाहीतर तो तुमचा विश्वास तोडू शकतो.
कुंभ : नवीन प्रकल्प शिस्तबद्ध पद्धतीने हाताळा. प्रवासाचे योग येणार आहेत. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडणार आहे. पद्धतशीर काम केल्याने तुमची कामे वेळेवर पूर्ण कराल. आज तुम्हाला अनेक कामात सुयश लाभणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावर उरणार नाही.
मीन : व्यवसायातही चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. मानसिकता द्विधा राहील. काहींना एकटेपणा जाणवणार आहे. तुमच्या मनात काही अनावश्यक विचार राहतील. आज तुमच्या कामात वरिष्ठांचे मोठे योगदान असेल. आपण मात्र शांत व संयमी राहावे. काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाणार आहे. तुम्ही तुमच्या पैशांच्या उधळपट्टीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. थोडक्यात आजचा दिवस सामान्य असणार आहे.