मेष : प्रॉपर्टी डीलर्सना मोठ्या डीलमधून चांगला फायदा होईल. आरोग्य उत्तम राहील. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता कमी होणार आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आज तुम्हाला इतरांशी विचारपूर्वक बोलण्याची गरज आहे. तुमच्यावर असणारी जबाबदारी तुम्ही योग्य रितीने पार पाडणार आहात. मनोबल उत्तम राहील. वाहन चालवताना आज काळजी घ्या. नातेसंबंधात समजून घ्या.
वृषभ : आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप मेहनत कराल. खर्च वाढणार आहेत. आज तुमची मानसिकता ही काहीशी नकारात्मक असणार आहे. आपल्याला स्वास्थ्य व समाधान कमी लाभेल. दैनंदिन कामे रखडणार आहेत. मनोरंजन क्षेत्राशी संबंधित या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असेल. काहींना मानसिक चिंता सतावणार आहेत. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. पात्रता वाढल्यामुळे नोकरीच्या क्षेत्रात यश मिळेल.
मिथुन : आज तुमचा आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे तुम्ही काम सहजपणे पूर्ण करू शकाल. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. मानसिक सकारात्मकता वाढेल. आर्थिक लाभ होणार आहेत. व्यवसायात येणाऱ्या समस्या आज अनुभवी व्यक्तीच्या मदतीने दूर होतील. तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर त्याकरिता आजचा दिवस अनुकूल आहे. सुसंवाद राहील. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. रखडलेले काम पूर्ण होईल. मित्रांकडून सहकार्य लाभेल.
कर्क : आज व्यवसायात मोठी प्रगती होईल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या अनेक संधी मिळतील. तुमचे मन आनंदी व आशावादी असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. तुम्हाला मानसिक प्रसन्नता देणारी घटना घडेल.तुमचे कुटुंबीय तुम्ही काहीही बोलाल ते मान्य करतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. नोकरी व व्यवसायात उत्तम स्थिती राहील. धन आणि पदात वाढ होईल. कोणत्याही वादविवादात योग्य अंतर ठेवा.
सिंह : कृषी रसायन व्यावसायिकांना आज अचानक मोठा फायदा होऊ शकतो. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाणार आहात. आरोग्य उत्तम राहील. कुठेतरी अडकलेले पैसे आज परत मिळतील. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. काहींना नवा मार्ग सापडेल. नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होईल. भेटवस्तू मिळतील.
कन्या : आज सुरू केलेले काम वेळेपूर्वी पूर्ण होईल. आर्थिक लाभाकरिता आजचा दिवस अनुकूल आहे. काहींना अचानक धनलाभ होईल. आर्थिक कामात सुयश लाभेल. व्यवसायाच्या संदर्भात कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत बाहेर जाऊ शकता. व्यवसायातील जुनी येणी वसूल होणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाची भेट घेऊन आला आहे. तुमचा प्रभाव वाढेल. बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. नोकरीच्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.
तूळ : खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मानसिक सकारात्मकता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली महत्त्वाची तसेच दैनंदिन कामे विनासायास मार्गी लावणार आहात. व्यवसायाच्या संदर्भात कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत बाहेर जाऊ शकता. गेले दोन दिवस जाणवत असणारी अस्वस्थता संपणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी उत्पन्न आणि खर्च दोघांचा समतोल राखा.
वृश्चिक : विज्ञानाशी संबंधित विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. मनोबल कमी असणार आहे. तुम्ही आज आराम करण्याच्या मूडमध्ये असणार आहात. आज तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. काहींचा मनोरंजन व करमणुकीकडे कल राहील. प्रवास टाळावेत. काही मौल्यवान वस्तू हरवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा.
धनु : आज अचानक आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. मित्र-मैत्रिणींशी सुसंवाद साधणार आहात. कोणतेही काम करताना घाई करू नका, अन्यथा तेच काम पुन्हा करावे लागू शकते. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. बाहेरचे अन्न खाणे टाळा, आरोग्य बिघडू शकते. कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल.
मकर : आज तुम्ही विनाकारण कोणाशीही चेष्टा करणे टाळावे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील. दीर्घकाळापासून योजलेले काम आज पूर्ण होईल, ज्यामुळे आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. मानसन्मानाचे योग येतील. प्रतिष्ठा वाढेल. वीन योजनांवर काम करण्यासाठी वेळ काढाल.कौटुंबिक जबाबदाऱ्या आज पूर्ण होतील.
कुंभ : आज तुम्ही तुमची बाब तुमच्या वरिष्ठांसमोर मांडल्यास तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. गेले दोन दिवस रखडलेली दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. वास्तुशास्त्राचे काम करणाऱ्या लोकांना चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभेल. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. भांडण टाळावे लागेल.
मीन : आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आज ऑफिसमधील लोक तुमची प्रशंसा करतील. मनोबल कमी असणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना आज मानसिक चिंता व ताण-तणाव राहण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर काही दिवस थांबा. वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. वादविवाद टाळावेत. व्यवसाय क्षेत्रातील समस्या दूर होतील. नोकरीच्या क्षेत्रातील प्रयत्नांचे फळ मिळेल.