मेष : मेष राशीची लोकं कामे चपळाईने अगदी सहजतेने पूर्ण करू शकतील. यात नशीबही तुमची साथ देईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आहारावर नियंत्रण हवे. विलासी जीवनाची अनुभूति घ्याल. अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना आज कामाच्या दरम्यान काही नवीन माहिती मिळेल, त्यामुळे कामे सहज पूर्ण होतील आणि मेहनतीचे फळही मिळेल. कामाचा आवाका वाढेल. दांपत्य जीवनातील गोडी वाढेल. आळस झटकून कामे करावीत. मित्रांचे सहकार्य मिळेल.
मिथुन : आज मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर कोणाशीतरी वाद होऊ शकतो. धरसोडपणा टाळून निर्णय घ्यावा. महत्त्वाच्या योजनांकडे लक्ष द्या. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.
कर्क : कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. मित्र आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ जाईल आणि महत्त्वाच्या कामासाठी मदतही मागू शकता. नवीन ओळख लाभदायक ठरेल. नियोजित कामे बरगळू शकतात. वरिष्ठांना खुश करावे लागेल. लपवाछपवीची कामे करू नका.
सिंह : सिंह राशीच्या लोकांची आज बुद्धिमत्ता आणि हुशारी दाखवून कार्यक्षेत्रातील कामे सहज पूर्ण होतील.आध्यात्मिक प्रगती होईल. झोपेची थोडीफार तक्रार जाणवेल. काही महत्त्वाच्या वस्तू खरेदी कराल. महत्त्वाच्या निर्णयात जोडीदाराचा सल्ला घ्यावा.
कन्या : कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस कार्यक्षेत्रात चांगला जाईल. घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि घरगुती कामात व्यस्त राहाल. कौटुंबिक नातेसंबंध जपाल. आर्थिक स्तर सुधारेल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा.
तूळ : तूळ राशीच्या लोकांनी तुमच्या शत्रूंना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नये. कुटुंब आणि मित्रांसह बाहेर फिरायला जाऊ शकता. प्रिय व्यक्ती सोबत नातेसंबंध सुधारतील. आवडत्या कामात वेळ जाईल. आर्थिक ताण कमी होईल. नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी चांगला जाईल. नवीन मित्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या योजना पूर्ण कराल. वाढीव जबाबदारी अंगावर घ्याल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मन काहीसे विचलीत राहील. कौटुंबिक समस्या जाणवू शकतात.
धनू : आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. परंतु दुपारनंतर काही वाद होण्याची शक्यता आहे. परिस्थितीतून शांततेने मार्ग काढाल. सरकारी कामात अडथळे येऊ शकतात. अनावश्यक गोष्टीत वेळ वाया घालवू नका. आरोग्याबाबत दक्ष राहावे.
मकर : मकर राशीच्या लोकांचा चांगल्या लोकांशी संपर्क होईल, जे तुम्हाला भविष्यात यश मिळविण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. तडजोडीला पर्याय नाही. समोरील परिस्थितीचा स्वीकार करावा. मुलांच्या मताला प्राधान्य द्यावे. अति भावनाशील होऊ नका.
कुंभ : आज तुमची वागणूक सौम्य असेल आणि वर्तनातील बदल इतरांसाठी चर्चेचा विषय बनेल. मानसिक ताण घेऊ नका. बोलताना इतरांचे मन दुखवू नका. अनुभवाचा उपयोग करून घ्यावा. वादाच्या प्रसंगांपासून दूर रहा.
मीन : मीन राशीच्या लोकांच्या आजच्या दिवसाची सुरुवात शुभवार्ता घेऊन होणार आहे. प्रियजनांपेक्षा ज्येष्ठ आणि सज्जनांचा आदर करण्यात पुढे राहाल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. नवे निर्णय घ्यायला सवड मिळेल. ज्येष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल. दिवस उत्साहात जाईल.