मेष : जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तुमची गरज भागवली जाईल. मनावर फार ताण घेऊ नका. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. राशीच्या लाभ स्थानात चंद्र असून मित्रमैत्रिणी भेट संभवते. अनेक लाभ होतील. घरात काही शुभ घटना घडतील. पाहुणे येतील. कामाच्या ठिकाणी नाव मिळेल. दिवस उत्तम.
वृषभ : आज दशम चंद्र मानसिक आणि आर्थिक स्थैर्य देईल. कुटुंबात तुमच्या मनासारख्या घटना घडतील. प्रवास घडेल. मन आनंदी राहिल. दिवस उत्तम.
मिथुन : राशीच्या भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण लाभ देणारे कौटुंबिक सुखाचे राहिल. आर्थिक लाभ होतील. गुरू शुभ फळ देईल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस शुभ. कामाचा फार बोभाटा करू नका. हाताखालील लोक सहाय्यक ठरतील. प्रलोभनापासून दूर राहावे. लपवाछपवीची कामे करू नका.
कर्क : मुलांशी हितगुज कराल. भागीदारीत फार अवलंबून राहू नका. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी. आज अष्टम स्थानातून होणारे चंद्र भ्रमण क्लेश देणारे आहे. सप्तमात शनी कुरबुरी सुरू ठेवेल. खर्च करावा लागेल. रवी बुध मार्ग दाखवतील. दिवस मध्यम आहे.
सिंह : राशीच्या सप्तम स्थानातून होणारे चंद्र भ्रमण आर्थिक, मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. जोडीदार आनंदी राहिल. खरेदी कराल. शुक्र लाभ देईल. व्यायामाला कंटाळा करू नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी. घरगुती वातावरण प्रसन्न राहील.दिवस उत्तम.
कन्या : आज षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमण घातक असून घरासाठी अशुभ आहे. जास्तीचे काम पडेल. खर्च होण्याचे संकेत. प्रकृती सांभाळा. नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल. वादावादीच्या मुद्दयात सहभाग होऊ नका. वचन करण्यावर भर द्या.दिवस मध्यम आहे.
तूळ : कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या घटना घडतील. जास्त जबाबदारी घेऊ नका. घरामध्ये संततीशी काही विषयात मतभेद असतील. विसंवादाला थारा देऊ नका. मनात कोणतेही आधी बाळगू नका. जुनी येणी प्राप्त होतील. प्रयत्नांना यश मिळेल. दिवस मध्यम आहे.
वृश्चिक : चतुर्थ स्थानातील चंद्र सुखद अनुभव देईल. फार दिवसांनी तुमची प्रकृती ठिक असेल. खर्च होईल पण आर्थिक लाभ देखील उत्तम राहिल. अंगीभूत कलेला वाव द्यावा. केलेली धावपळ सार्थकी लागेल. कामे हातावेगळी केल्याचा आनंद लाभेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. दिवस बरा आहे.
धनु : आज चंद्र भ्रमण आणि शनी प्रवासाचे संकेत देत आहेत. वाहन योग येईल. आर्थिकदृष्ट्या काळ बरा आहे. जोडीदार आनंदी राहिल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. घरगुती वातावरण चिघळू देऊ नका. संयमाने कामे कराल.दिवस मध्यम.
मकर : आजचा दिवस कुटुंबीयासमवेत शांतपणे घालवा. त्यांना वेळ द्या. आर्थिक लाभ होतील. कार्यक्षेत्रात काळजी घ्या. खर्च जपून करा. जवळच्या मित्रांचा सहवास लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रेम सौख्यात वाढ होईल.दिवस उत्तम .
कुंभ : आज आरोग्यास त्रासदायक दिवस राहणार आहे. मंगळ तृतीय स्थानात असून प्रकृती नाजूक, आर्थिकदृष्ट्या जपून राहण्याचा काळ आहे. प्रवास कराल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. दिवस आनंददायी ठरेल. कोणावरही फार विसंबून राहू नका.दिवस मध्यम जाईल.
मीन : आज घरेलु जीवन आणि संतती याला महत्त्व असेल. गुरू धार्मिक कारणांसाठी खर्च करेल. आज दिवस मध्यम असून गुरूची उपासना करावी. बर्याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील. वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागेल. बोलण्यात गोडवा ठेवावा.