मेष : आज आपण अधिक हळवे व भावनाशील होण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. आज लहान -सहान गोष्टींनी आपल्या मनास ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संपत्ती विषयक कोणतेही काम करायला आजचा दिवस प्रतिकूल आहे.
वृषभ : आज आपल्या चिंता दूर होऊन आपल्या उत्साहात वाढ होईल. मन आनंदी राहील. जास्त भावूक व हळवे व्हाल. आपली कल्पनाशक्ती विकसित होईल. त्यामुळे सृजनशील साहित्य रचना करू शकाल. व्यवसायामघ्ये आलेल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत. कामात घाई मात्र करु नका.
मिथुन : आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज थकवा, कार्यमग्नता व प्रसन्नता ह्यांचा संमिश्र अनुभव येईल. निर्धारित कामे पूर्ण करू शकाल.न्यायालयीन वाद मिटतील. कोणत्याही नव्या वादात अडकू नका.
कर्क : दाम्पत्य जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार आहेत. आजचा दिवस सर्व दृष्टीने आनंददायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयां कडून सौख्य व आनंद ह्यांची प्राप्ती होईल.मनात कोणत्याही प्रकारचं दुमत ठेवू नका. नवं घर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
सिंह : सर्व तणाव दूर होणार आहे. छोट्यांच्या हट्टाखात एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठीचे बेत आखाल. आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. शक्यतो निरर्थक वाद टाळा. शुभकार्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
कन्या : कुटुंबात शुभवार्ता मिळणार आहे. विवाहोत्सुकांसाठी एखादं चांगलं आणि मनाजोगं स्थळ येणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धन प्राप्ती होईल. मित्र – मैत्रिणीं कडून काही लाभ संभवतात. व्यापारात धन वृद्धी संभवते. नोकरीची नवी संधी मिळणार आहे.
तुळ : एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर कुटुंबीयांसमवेत चर्चा कराल. परस्पर मतभेद वाढतील. नोकरीत बढतीची संधी लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे.
वृश्चिक : घरी पाहुणे येणार आहेत. हेच पाहुणे तुमच्या प्रगतीस कारणही ठरणार आहे. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अनावश्यक खर्च वाढतील. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. शक्यतो आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. राजकीय समस्या उदभवतील. कायम नशिबासाठी कृतज्ञ मात्र राहा.
धनु : मोठा प्रवासयोग आहे. एखाद्या नव्या ठिकाणी गेल्याचा अनुभव तुम्हाला आणखी समृद्ध करणार आहे. पाण्या पासून सावध राहावे लागेल. उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामांपासून दूर राहणे हितावह राहील. व्यवसायात नव्या संकल्पनांमध्ये प्रवेश कराल.
मकर : आज तुमचा प्रत्येक शब्द प्रमाण असणार आहे. मोठे निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्यावर असणाऱ आहे. आज आपल्या विचारात व व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय व मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. शरीर व मन, स्फूर्ती व प्रसन्नतेने भरेल. मित्रांची साथ तुम्हाला मिळणार आहे.
कुंभ : आर्थिक परिस्थिती सुधारेल. खाण्यापिण्यावर लक्ष द्या. कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. तन – मन उत्साही व आनंदी असेल. भावनात्मक विचारांचा दिवस आहे. सासरी तुमच्याविषयी असणारा आदर आणखी वाढेल.
मीन : कामाच्या नव्या संधी मिळणार आहेत. एखादा मोठा आणि दूरचा प्रवास करण्याची संधी मिळेल. आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. जुने मित्र एकत्र येऊन एखाद्या सहलीचा बेत आखाल.
















