मेष : हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस, आपण आपला व्यवसाय व कौटुंबिक जीवन सुखद करण्याचा प्रयत्न कराल. व्यावसायिक कारणांमुळे केलेले प्रवास आपल्यासाठी लाभदायी ठरतील.धनू राशीतून होणारी गुरुपौर्णिमा तुमच्या भाग्य स्थानातून होत आहे. या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून नवीन संकल्पनांना सुरुवात करा. पौर्णिमेचा प्रहर शुभदायक ठरेल. दिनांक १०, ११ रोजी मात्र सहनशीलता ठेवून काम करावे लागेल. कारण या दिवशी जबरदस्तीने एखादी गोष्ट करायला गेला तर ती अंगलट येऊ शकते. त्यासाठी झेपेल अशाच गोष्टी करा.
वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपण कोणतेही नवीन काम हाती घेऊ नये. सध्या जे काही चालले आहे ते चालूच ठेवावे. हा आठवडा आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी प्रतिकूल असल्याने सावध राहावे.ही गुरुपौर्णिमा अष्टम स्थानातून होत आहे. तेव्हा या पौर्णिमा प्रहरात घाईगडबडीने कृती करणे टाळा. दिनांक १२, १३ रोजीचे हे दोन्ही दिवस स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिका. इतरांवर अवलंबून कोणताही निर्णय घेऊ नका. त्यामुळे तुम्ही ठरवलेल्या नियोजनाची घडी विस्कळीत होऊ शकते.
मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या प्राप्तीत वाढ होताना दिसून येईल. आता आपण नेहमीच्या प्राप्ती व्यतिरिक्त अतिरिक्त प्राप्तीसाठीचे स्रोत सुद्धा मिळवू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन परस्पर समजुतीने वाटचाल करेल.गुरुपौर्णिमा सप्तम स्थानातून होत आहे. या गुरुपौर्णिमेच्या प्रहरात जोडीदारांसोबत धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. गुरूसमान असलेल्या व्यक्तींचा आदरपूर्वक सन्मान कराल. सध्या चंद्र ग्रहाचे भ्रमण षष्ठ स्थानातून अष्टम स्थानाकडे होत आहे. एखाद्या व्यक्तीला सल्ला देताना विचार करा.
कर्क : हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याची सुरवात खूप चांगली होऊन आपण उर्जावान व्हाल. आपले प्रणयी जीवन सुद्धा खूप चांगले राहील.गुरुपौर्णिमा षष्ठ स्थानातून होत आहे. या पौर्णिमा प्रहरात मर्यादा ओलांडू नका. ही पौर्णिमा सुखकर करण्याचा प्रयत्न करा. षष्ठ स्थानातून अष्टम स्थानाकडे होणारे चंद्राचे प्रमाण अनुकूल कसे होईल याकडे लक्ष द्या. चांगल्या गोष्टींना सुरुवात करण्यासाठी थोडे थांबा. तेव्हा आपणास फक्त स्वतःच्या कामावरच लक्ष केंद्रित करावे लागेल. इतर गोष्टीने आपण व्यथित होऊ नये.
सिंह : हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला आहे. आपण आपल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडू शकाल. तसेच कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवाल. आपण आपल्या इच्छांचा सुद्धा विचार कराल. गुरुपौर्णिमा पंचम स्थानातून होत आहे. गुरुपौर्णिमा आनंद देणारी असेल. या दिवशी चांगल्या गोष्टींची सुरुवात होईल. दिनांक १४, १५ रोजी जाणूनबुजून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कन्या : हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेसह एखाद्या नवीन ठिकाणी फिरावयास जाऊन वेळेचा आनंद घेऊ शकाल. गुरुपौर्णिमा चतुर्थ स्थानातून होत आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्त योजलेल्या मनोकामना पूर्ण होतील. दिनांक १६ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. आपल्या हातून कोणतीही चूक होणार नाही ह्याची काळजी घेऊन आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. व्यापाऱ्यांना त्यांच्या कामात फायदा होईल. ह्या आठवड्यात त्यांना अतिरिक्त लाभ होताना दिसून येईल.
तूळ : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. प्राप्तीत वाढ होईल. गुरुपौर्णिमा पराक्रमस्थानातून होत आहे. ही पौर्णिमा उत्साहाने साजरी कराल. आठवडय़ातील सर्व दिवस चांगले जातील. आजचे काम उद्यावर जात होते ते जाणार नाही. बाकी राहिलेले व्यवहार पूर्ण होतील. तेव्हा या संधीचा फायदा घेऊन सुरुवात करा. व्यावसायिक वाटचाल यशस्वी असेल.पैसे आल्याने आपण खूप आनंदित व्हाल. हा आनंद आपण इतरांसह वाटून घ्याल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. विवाहितांच्या जीवनात अनेक आव्हाने येतील. प्रेमीजन आपल्या संबंधांना सहजपणे समजू शकतील.
वृश्चिक : ह्या आठवड्याच्या सुरवातीस आपल्यावर थोडा मानसिक दबाव असेल. परंतु, काही कारणाने आपण आनंदित सुद्धा होऊ शकता. गुरुपौर्णिमा धनस्थानातून होत आहे. या पौर्णिमा काळात सुखाचे क्षण अनुभवाल. खूप प्रयत्न करूनही एखाद्या गोष्टीला यश मिळत नव्हते, हीच परिस्थिती बदलणारी आहे. प्रयत्नाचे फळ मिळणारच आहे. आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधण्याची संधी मिळेल. अविवाहितांचा विवाह ठरण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेसाठी निवड होऊन त्यात यश प्राप्तीची संभावना सुद्धा आहे.
धनू : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण आपल्या कुटुंबास अधिक महत्व द्याल. कुटुंबीयांप्रती आपण भावुक सुद्धा व्हाल.गुरुपौर्णिमा तुमच्या राशीतूनच होत आहे. ही गुरुपौर्णिमा संस्मरणीय ठरेल. दिनांक १०, ११ रोजी कोणत्याही कामात अति घाई करू नका. ती कामे पुढे ढकला. इतरांनी कान भरवण्याचा प्रयत्न केला तरी ऐकीव बातमीवर विश्वास ठेवू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चढ – उतारांचा आहे. तेव्हा सावध राहावे.
मकर : हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. खर्चात सुद्धा थोडी कपात होईल. प्रकृती उत्तम राहील. गुरुपौर्णिमा व्ययस्थानातून होत आहे. या पौर्णिमा प्रहरात शांततेच्या मार्गाने वाटचाल ठेवा व पौर्णिमा सुखकर करण्याचा प्रयत्न करा. दिनांक १२,१३ रोजी कोणत्याही गोष्टीचा सोक्षमोक्ष करताना भान ठेवा. कुटुंबाचा पाठिंबा राहील. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. शारीरिकदृष्टय़ा योग साधनेला महत्त्व द्या.
कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण सर्व लक्ष आपल्या कामावर केंद्रित कराल. गुरुपौर्णिमा लाभस्थानातून होत आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्त ठरवलेले ध्येय साध्य होईल. दिनांक १४, १५ रोजी उतावळेपणाने घेतलेले निर्णय त्रासाचे ठरू शकतात. या दोन दिवसांत मात्र जपून वाटचाल करा. मित्र परिवारासोबत महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा कराल. मुलांची साथ राहील. आरोग्याच्या बाबतीत जुन्या व्याधींकडे दुर्लक्ष करू नका. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या व्यवसायास गती आल्याने आपणास चांगला फायदा होईल.
मीन : हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला आहे. आपणास नशिबाची साथ मिळेल. आठवड्याच्या सुरवातीस आपण नदी काठी फिरावयास जाऊ शकाल. आपल्या मनात धार्मिक विचार येतील. धार्मिक कार्ये केल्याने आपणास आनंद प्राप्त होईल. गुरुपौर्णिमा दशमस्थानातून होत आहे. ही गुरुपौर्णिमा थोरामोठय़ांची कृपा मिळवून देईल. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे.घरगुती वातावरण चांगले असेल. मानसिक शांतता लाभेल. उपासनेत मन रमेल. आरोग्य उत्तम राहील.