मुंबई (वृत्तसंस्था) मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातले सर्व निर्बंध एकमताने हटवण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर विरोधी पक्ष महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. “आम्ही निर्बंध लादू असे दोन दिवसांपूर्वीच म्हणणाऱ्या सरकारला आता रातोरात कशी काय अक्कल आली?” अखेर जनतेसमोर तीन पक्षाच्या सरकारला झुकावे लागले. हा जनतेचा विजय आहे. असे भाजप आमदार राम कदम यांनी म्हटले आहे.
“महाराष्ट्राचं सरकार हिंदूंचा सण गुढीपाडवा, १४ एप्रिल रोजीची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणुकीवर निर्बंध घालायला निघालं होतं. ज्यावेळी आम्ही ठणकावून सांगितलं की तुमचे निर्बंध चुलीत जाळून खाक करू, तुमचे निर्बंध आम्ही मानणार नाही. आंबेडकर जयंतीच्या मिरवणूका देखील जोरात निघतील. गुढीपाडवा, रामनवमी देखील उत्साहात साजरी होईल. असं आम्हाला ठणकावून सांगण्याची वेळ का आली? हेच सरकार दोन दिवसांपूर्वी म्हणत होतं की आम्ही निर्बंध लादू, तेव्हा काय अक्कल गहाण ठेवली होती? आता रातोरात कशी काय अक्कल आली? ” असं राम कदम यांनी म्हटलं आहे.
तसेच, “आता रातोरात त्यांना निर्बंध यासाठी मागे घ्यावे लागत आहेत, की आम्ही सांगितलं की तुमचे निर्बंध आम्हाला चुलीत जाळून खाक करावे लागतील. जनतेचा प्रक्षोभ पाहून आज निर्बंध मागे घ्यावे लागले आहेत. हा जनतेचा विजय आहे. तीन पक्षाच्या सरकारला झुकावं लागलं.” असंही राम कदम म्हणाले आहेत.