मुंबई (वृत्तसंस्था) ताप आला, डोकं दुखलं किंवा अंग दुखायला लागलं तर आपण सरळ मेडिकलमध्ये जाता आणि पॅरासिटोमोलची गोळी घेता ना? कोरोना महामारीच्या काळात तर लस टोचली की, तीच गोळी दिली जायची. साहजिक त्याचा खप जास्त असला पाहिजे हो ना? पण, तुम्हाला माहिती आहे का? मार्च २०२० पासून Dolo 650 नावाच्या गोळीची प्रचंड प्रमाणात विक्री झाली आहे. तब्बल ५६७ कोटींची विक्री झाली आहे.
Dolo 650 ने मार्च २०२० पासून ५६७ कोटी रुपये कमावले
मार्च २०२० पासून ५६७ कोटी रुपयांच्या डोलो ६५० टॅब्लेटची विक्री झाली आहे. एवढेच नाही तर या गोळीला कोरोनाच्या काळात आवडता ‘स्नॅक’ म्हटले जात आहे. एका वर्षात त्याची इतकी विक्री झाली की गेल्या आठवड्यात #Dolo650 सोशल मीडियावर मेम फेस्टमध्ये ट्रेंड करत होता. या काळात ही गोळी इतकी का वापरली गेली, डॉक्टरांनी ही गोळी रुग्णांसाठी एवढी का लिहिली? असे प्रश्न सगळ्यांना पडत आहे.
जानेवारी २०२० पासून पॅरासिटामोलची विक्री पाहता, हे लक्षात येतं की Dolo 650 विक्रीच्या बाबतीत अव्वल आहे. विक्रीच्या बाबतीत कल्पोल आणि सुमो एल दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतात पॅरासिटामोलचे ३७ ब्रँड आहेत. ज्यांची विक्री देशातील विविध प्रदेशांमध्ये सर्वाधिक आहे. Dolo 650 ची निर्मिती बंगळुरू येथील मायक्रो लॅब्स लिमिटेडद्वारे केली जाते. दुसरीकडे, जीएसके फार्मास्युटिकल्स कॅल्पोलचे उत्पादन करते आणि या दोन्ही गोळ्या सामान्यतः डॉक्टर रुग्णांसाठी लिहून देतात.
डिसेंबर २०२१ मध्ये डोलो ६५० ने २८.९ कोटी रुपयांची विक्री केली. जी मागील वर्षी याच महिन्यातील विक्रीपेक्षा ६१.४५ टक्के अधिक होती. परंतु त्याची सर्वाधिक विक्री एप्रिल-मे २०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झाली होती. एप्रिलमध्ये त्याच्या विक्रीने ४८.९ कोटी कमावले तर मेमध्ये ४४.२ कोटी रुपये कमावले.