नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामस्थ व शेतकरी बंधूंनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वातील विकास कामांच्या धडाका पाहून शिवसेनेत प्रवेश केला.
आज नांदेड येथील शेतकरी व ग्रामस्थ यांनी गुलाबराव पाटील यांच्या विकास कामांच्या वेग बघून त्याप्रमाणे आपल्याही गावाचा विकास झाला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त करून शेकडोच्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये राकेश पाटील, भरत बराटे, गणेश चौधरी, तुषार अत्तरदे रमाकांत इंगळे, तानकु भोई, महेंद्र चौधरी, हर्षल पिंपरकर, हरी भोळे, शरद नेमाडे, रामू चौधरी, गणेश जंगले, नितीन जंगले, संजय नेमाडे, नामदेव भोळे, राजेंद्र भोळे, पद्माकर आत्तरदे, प्रवीण पाटील, धीरज पाटील, रत्नाकर नेमाडे, भूषण अत्तरदे, पलास बराटे, यश पाटील, दत्तात्रय चौधरी, हीतू अत्तरदे, प्रशांत जंगले यांच्यासह आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख आबा माळी, युवा सेना तालुका उपाध्यक्ष भरत सैंदाणे, महेश रायसिंगे, युवा सेना शाखा अध्यक्ष ललित पाटील, युवा सेना शाखाध्यक्ष गोकुळ सैंदाणे, मागासवर्गीय सेना शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी, गिरीश पाटील, गभा भोई, महेंद्र सोनवणे, आप्पा शिरसाट हे उपस्थित होते