पिंपरी (वृत्तसंस्था) पतीनं पत्नीला पॉर्न व्हिडीओ (Porn video) दाखवून पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीर संबंध (Unnatural sex with wife) ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिसांनी तिचा पती, दीर, सासू व नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी शुक्रवारी पीडित विवाहितेनं देहूरोड पोलीस ठाण्यात पतीसह सासू, दीर आणि नणंद यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आरोपींनी पीडित विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. तसेच फिर्यादीला काळी, बुटकी असं बोलून सतत टोमणे दिले आहेत. तसेच लग्नात सोनं कमी दिल्याच्या कारणातून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप पीडितेनं आपल्या तक्रारीत केला आहे. तसेच सासू आणि नणंद यांनी पीडित महिलेचे डोक्यावरील केस पकडून मारल्याचंही पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर पीडित महिलेच्या पतीने तिला पॉर्न व्हिडीओ दाखवून तिची इच्छा नसताना, अनैसर्गिक शरीर संबंध ठेवले आहेत. संबंधित धक्कादायक प्रकार २८ ऑगस्ट ते १ ऑक्टोबर दरम्यान नाशिक येथील देवळाली कॅम्प येथे घडला आहे. आरोपींनी पीडितेला नरक यातना दिल्या आहेत.
अखेर आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं शुक्रवारी ७ जानेवारी रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पतीसह सासू, दीर आणि नणंदेविरोधात घरगुती हिंसाचारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.