धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथील माहेर असलेल्या एका २६ वर्षीय विवाहितेचा कौटुंबिक वादातून पतीने चाकू भोसकून खून केल्याची घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, पतीने शालकावर देखील वार करून गंभीर जखमी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुजार सुनिल पवार (वय-२६) या विवाहितेची पाळधी येथे माहेर आहे. बुधवारी पती सुनील बळीराम पवार हा पाळधी येथे गेला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास कौटुंबिक वादातून त्याने पत्नीवर चाकूने वार केला. पूजा ह्या जखमी होताच तात्काळ रुग्ण वाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिचा मृत्यू झाला. दरम्यान शालक शंकर चव्हाण (वय २०) यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती कळताच जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी रुग्णालयात भेट दिली.
मयत पुजाच्या पश्चात मुलगी भाग्यश्री, भावना आणि मुलगा ओम असा परिवार आहे.