बोदवड (प्रतिनिधी) पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस दौंड कॉर्डलाइनमार्गे अहमदनगर आणि मनमाडमार्गे अमरावतीपर्यंत वाढवण्यात आलीय. या गाडीला बोदवड येथे थांबा मंजूर करण्यात आला आहे.
रेल्वे मंत्रालयाने ही गाडी सोमवारपासून (दि. १३) अमरावतीपर्यंत धावणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. क्र. ११०२५ पुणे – अमरावती एक्स्प्रेस ही गाडी दि. १३ पासून पुणे येथून ११.०५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री पाउन वाजता पोहोचेल, तर क्र. ११०२६ अमरावती-पुणे एक्स्प्रेस ही गाडी दि. १३ पासून रोज अमरावती येथून रात्री १०.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पोहोचेल.
उरुळी, द कॉर्डलाइन अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, कजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, बडनेरा या ठिकाणी या गाडीला थांबे असतील. रेल्वेकडून बोदवडला दिवाळी भेट हुतात्मा एक्स्प्रेस गाडीला बोदवड येथे थांबा मिळावा यासाठी दिव्यांग संघटना, व्यापारी संघटना, प्रवासी संघटना यांनी दोन महिन्यापूर्वी रेल्वे रोको केले होते. त्यामुळे या गाडीला बोदवड रेल्वेस्थानकावर दि. १३ नोव्हेंबरपासून थांबा देण्यात आला आहे.
अमरावतीकडे जाण्यासाठी ही गाडी बोदवड रेल्वेस्थानकात रात्री ९:३५ वाजता सुटेल, तर पुण्याकडे जाण्यासाठी ही गाडी बोदवड स्थानकातून रात्री १:५० वाजता सुटेल. आता सेवाग्राम तसेच अमरावती सुरत या गाडीला ही थांबा देण्याची मागणी होत आहे. पूर्वी हुतात्मा एक्सप्रेसला फक्त सीटिंग चेअर कार होते. परंतू आता अमरावती- हुतात्मा एक्सप्रेसला रेल्वे प्रशासनाने एक स्लीपर डबा जोडण्यात आला आहे.
















