जळगाव (प्रतिनिधी) आज जगभरात परिस्थिती हलाखीची आहे, त्यामुळे आशा काळात कोणी राजकारण करू नये, असे नितीन गडकरी सांगितले. त्यांच्या मताशी मी सहमत आहे, असे स्पष्ट मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारच्या कामाचे कौतुक केलं आहे, यावर तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न केला असता खडसे म्हणाले की, या सर्वांचे उत्तर नितीन गडकरी यांनी दिले आहे, त्यामुळे मला नव्याने सांगण्याची गरज वाटत नाही.
गडकरी यांनी म्हटले आहे की, आज जगभरात परिस्थिती हलाखीची आहे, त्यामुळे आशा काळात कोणी राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाशी लढा द्यावा लागला अशी भूमिका त्यांनी मांडली.
हीच भूमिका मी सुद्धा मांडली होती, त्यावेळी मी म्हटले होते आजच्या काळात राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे. त्यामुळे मलाही असे वाटते की आजच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन सरकारला मदत करावी नुसतच न बोलता ते आपल्या कृतीतून दाखवून द्यावे. उगाचच दररोज काही झालं की टीका करणे हे बंद केले पाहिजे. दररोज आले की टीका करणे यामुळे यंत्रणा नाउमेद होते असे गडकरी यांनी म्हटले आहे. मी त्याच्याशी सहमत आहे. असं मत एकनाथराव खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.
















