यवतमाळ (वृत्तसंस्था) माझी मुलगी तुझ्याच शाळेत शिकते, तुलाही शाळेत सोडतो, असा बहाणा करून दुचाकीवर बसवून नेत ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उमरखेड तालुक्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीचा कसून शोध सुरू केला आहे.
एका खासगी शाळेत जाण्यासाठी पीडिता बसस्थानकावर उभी होती. याचवेळी एका दुचाकीस्वाराने त्याने तिला आपल्या दुचाकीवर बसायला सांगितले. परंतू मुलीने नकार दिला. त्यानंतर त्याने ‘माझी मुलगी तुझ्याच शाळेत शिकते. तरीही ती चिमुरडी त्याच्या दुचाकीवर बसायला तयार नव्हती. बसण्यास तयार नव्हती. अखेरीस त्याने ‘मी तुझ्या भावासारखा आहे. तू बस घाबरू नको असं सांगून विश्वास संपादन करून पीडितेला सोबत नेले. त्यानंतर विद्यार्थिनीला शेतशिवार परिसरातील एका शेतात नेऊन जबरीने अत्याचार केला. तसेच याबाबत कुणाला सांगितले तर जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. त्यानंतर पीडितेला उमरखेडमध्ये एका मंदिराजवळ सोडून दिले.
पिडीता रडत रडत कशी तरी शाळेत पोहोचली. मात्र, काही तरी गंभीर प्रकार घडल्याचे लक्षात येताच शिक्षकांना पीडितेच्या कुटुंबीयाशी संपर्क साधला. पोफाळी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ अज्ञात आरोपीविरुद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला. सात ते आठ पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आल्या आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून, लवकरच आरोपी अटक होण्याची शक्यता आहे.