उस्मानाबाद (वृत्तसंस्था) अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केली. मात्र आमदार सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) यांनी केतकी चितळेचं समर्थन केलं आहे. केतकी चितळे मला अभिमान असल्याच सांगत ती कणखर आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी केतकीचं कौतुक केलं आहे.
शरद पवार यांच्याबद्दल पोस्ट केल्यानंतर केतकी चितळेला अटक झाली. तिच्या विरोधात टिकेची झोड उठली असताना सदाभाऊ खोत हे केतकीच्या पाठिशी उभे आहेत. केतकी चितळे मला अभिमान असल्याच सांगत ती कणखर आहे. तिला समर्थनाची गरज नाही आणि तिला मानावे लागेल. न्यायालयात तिने स्व:ताची बाजू स्व:ता मांडली, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेच कौतुक केलं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, चंद्रकात पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती असा सवाल ही सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला विचारला आहे. सदाभाऊ खोत यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी केतकी चितळेचं समर्थन केलं.