मुंबई (वृत्तसंस्था) ‘सत्ता गेल्याच्या नंतर त्रास होत असतो. ते मी समजू शकतो. त्या त्रासाच्या, उद्वेगाच्या पोटी लोकं अशी शब्द वापरत असतील. त्यांची सत्ता गेली ही अस्वस्थता आहे’ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला लगावला आहे.
‘हे सरकार बेईमानीने आले आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, असा सवाल विचारला असता पवार म्हणाले की, ‘सत्ता गेल्या नंतर त्रास होत असतो. ते मी समजू शकतो. त्या त्रासाच्या, उद्वेगाच्या पोटी लोकं अशी शब्दं वापरत असतील. त्याचे इतके गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांची सत्ता गेली ही अस्वस्थता आहे.’ मुंबईत राष्ट्रवादीच्या मुख्यालयात भाजपचे नेते जयसिंग गायकवाड यांचा पक्षप्रवेश झाला. त्यानंतर पत्रकार परिषद शरद पवार यांनी भाजपचे नेते रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. तसंच, ‘साहजिक माणसाने काही आशा, अपेक्षा ठेवावी. त्याबद्दल काही वाद नाही. कारण त्यांनी मागेही सांगितले होते ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, पण त्यामुळे कालही ते असंच काही बोलले होते. पण, ठीक आहे, लोकं त्याच्याकडे बारकाईने लक्ष देतात. ती अतिभावना असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे, हे लोकांच्या अधिक लक्षात येईल, असं टोलाही पवारांनी लगावला. रावसाहेब दानवे यांनी दोन महिन्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले असं भाकीत वर्तवलं होतं, यादबद्दल शरद पवार यांना विचारले असता पवारांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.
‘रावसाहेब दानवे यांनी विधिमंडळात अनेक वर्ष काम केले आहे. त्यांना आम्ही काम करताना पाहिले आहे. पण ठीक आहे. त्यांचा हा गूण मला माहिती नव्हता. खेड्यापाड्यातून आलेला नेता म्हणून मी त्यांच्याकडे पाहत होतो. त्यांची ज्योतिष्य अभ्यासाची तयारी मला माहिती नव्हती. ज्योतिष्य शास्त्राचा जानकार म्हणून त्यांचा परिचय नव्हता, तो आता झाला आहे. पण, सामन्य माणसं जर सोबत असतील कुडमुड्या ज्योतिष्याचे काही चालत नाही’ असा सणसणीत टोला पवारांनी दानवेंना लगावला.