जळगाव (प्रतिनिधी) मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी आहे.
खडसे पुढे म्हणाले की, गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले. मला अक्कल शिकायला चालले होते. मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पार्टीला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसाने छळलं, असे म्हणत खडसेंनी देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला होता.