जळगाव (वृत्तसंस्था) होय मी गुवहाटीला चाललो आहे, जिल्ह्यातील तीन जण गेले आहेत. तसेच अनेक जण गेले आहेत. मी एकटा राहून काय करू?, असे स्पष्ट मत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले. तसेच माझ्या रक्तात शिवसेना आहे, आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार आहोत, असंही ते म्हणाले.
राज्यात सद्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक मंत्री तसेच आमदारासह ४० जण असल्याचे सांगण्यात येत आहे. सद्या ते सर्व आसाम राज्यातील गुवहाटी येथे आहेत. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे चार पैकी तीन आमदार अगोदरच गुवाहाटी येथे गेले आहेत. मंत्री गुलाबराव पाटीलही नॉट रिचेबल होते. त्यामुळे त्यांच्याबाबतीतही चर्चा सुरू होती.
याबाबत त्यांच्याशी थेट फोनवरुन चर्चा केली असता ‘एका वृत्तवाहिनी’शी बोलताना ते म्हणाले, होय मी गुवहाटीला चाललो आहे, जिल्ह्यातील तीन जण गेले आहेत. तसेच अनेक जण गेले आहेत. मी एकटा राहून काय करू? शिवसेनेच्या परिस्थितीबाबत बोलतांना ते म्हणाले, कि अत्यंत वाईट परिस्थिती आहे, सर्वच फाटल आहे. त्यामुळे आता ते साधंणही कठीण आहे. वातावरण पाहून पक्षाच्या प्रमुखांनी निर्णय घ्यायला हवा होता. परंतु आता त्याचीही वेळ निघून गेली आहे. होय पण आपण पक्ष बदलणार नाही, आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार आहोत. शिवसैनिक म्हणूनच कार्य करणार आहोत. कारण शिवसेना, आपल्या रक्तात आहे.