TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्य सरकार बनली गरिबांची शत्रू ; रेशनच्या गहू, तांदळाची अनुक्रमे २० व ४० टक्के कपात !

गरीब लाभार्थी हवालदील,FC साखरही होणार गायब

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जानेवारी महिन्यात वितरित होणाऱ्या स्वस्त धान्यात संपूर्ण राज्यभर कपात करण्यात आल्यामुळे गरीब लाभार्थी हवालदील झाले आहेत. थोडक्यात एकीकडे कोरोनाची तिसरी लाट सुरु झालीय आणि दुसरीकडे राज्य सरकार गरिबांची शत्रू बनली असल्याची टीका भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी केली आहे.

एकूण मागणीपैकी ८२.१९, तर तांदूळ ५९.९७ टक्केच प्राप्त
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना पत्र पाठवून गव्हात २०, तर तांदळाच्या वितरणात ४० टक्के कपात करण्याच्या सूचना केल्याचे कळते. धरणगाव शहर व तालुक्यात १०६ धान्य दुकानांव्दारे धान्य वितरण केले जाते. जानेवारी महिन्याचे धान्य नियतन दुकानदारांना वितरित केले जात असून, पुढील आठवड्यात ते कार्डधारकांपर्यंत पोहोचणार आहे. परंतू गव्हाच्या एकूण मागणीपैकी ८२.१९, तर तांदूळ ५९.९७ टक्केच प्राप्त झाला आहे. अंत्योदय कार्डधारक १७ हजार १०२ असून, प्रतिकार्ड २५ किलो गहू, तर १० किलो तांदूळ दिला जातो.

READ ALSO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

शिल्लक धान्याची माहिती न घेताच कपात
अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य शिधापत्रिका धारकांनाही दरमहा गहू व तांदळाचे वितरण केले जाते. यात प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, तर दोन किलो तांदूळ दिला जातो. धरणगाव तालुक्य अन्न सुरक्षा योजनेतील धान्य वितरणाचा लाभ ७ हजार ३४३ रेशनकार्ड धारकांना होतो. तर लाभार्थींची संख्या ९९ हजार ५१७ आहे. दुसरीकडे शिल्लक धान्याची माहिती न घेताच २० टक्के गहू, तर ४० टक्के तांदूळ कपात करण्यात आल्यामुळे लाभार्थींची मोठी गैरसोय होणार आहे.

स्वस्तधान्य दुकानदार सापडले संकटात
लाभार्थ्यांना मशीनमध्ये पूर्ण आलेला कोटा दिसेल. त्यामुळे धान्य कमी दिल्यावर लाभार्थी दुकानदाराला जाब विचारतील. त्यावर दुकानदार काय उत्तर देणार?. यातून दुकानाच्या तक्रारी तसेच दुकानावर मोठे वाद होण्याची शक्यता आहे. विरोध केला तर अधिकारी त्रास देतील आणि कमी धान्य दिले तर लाभार्थी…त्यामुळे ‘एकडे आड तिकडे विहीर’, अशा संकटात स्वस्तधान्य दुकानदार सापडले आहेत. याबाबत धरणगाव तहसीलदारांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

साखरही होणार गायब
प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना रेशनवरील साखर बंद करण्यात आली आहे. सध्या अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच साखर दिली जाते. परंतू जानेवारी महिन्यात राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना यंदा रेशनवर साखर मिळणार नाहीय. यामुळे देखील तीव्र नाराजी आहे.

धरणगाव तालुक्यातील जनता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील धक्क्यातून अद्याप सावरलेली नाहीय. तर तिसरी लाट नुकतीच सुरु झालीय आणि तशात सर्वसामान्यांना मिळणाऱ्या रेशनच्या धान्यातही कपात म्हणजे गरीबांचा जीव घेणारी ठरणार आहे. त्यामुळे गरिबांना संपूर्ण धान्य मिळाले पाहिजे, अन्यथा भाजप आंदोलन करेल.
-अॅड. संजय महाजन (भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
Next Post

तब्बल ८७०० जागांसाठी शिक्षकांची भरती ; इथे लगेच करा अप्लाय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक ! किरकोळ कारणावरून भररस्त्यात तरुणाच्या छातीत खुपसला चाकू

March 16, 2022

कट्टा बाळगणाऱ्याकडे पाच लाख मागणाऱ्या पोलिसाचे निलंबन ; पोलीस अधीक्षकांचे आदेश !

January 28, 2024

DCGI कडून मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

January 3, 2021

प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षाचालकासह एकाला अटक ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group