मुंबई (वृत्तसंस्था) मी काशिफ खानला ओळखत नाही. त्याने मला पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं. पण मी पार्टीला गेलो नाही, असा खुलासा पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला. तसेच क्रुझवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. त्या पार्टीच्या माध्यमातून काही षडयंत्र रचण्याचा डाव होता की नाही हे मला माहीत नाही. त्याचा तपास एजन्सीने करावं, असंही ते म्हणाले.
‘मी काशिफ खानला ओळखत नाही. त्याने मला पार्टीसाठी निमंत्रण दिलं होतं. पण मी पार्टीला गेलो नाही. क्रुझवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. त्या पार्टीच्या माध्यमातून काही षडयंत्र रचण्याचा डाव होता की नाही हे मला माहीत नाही. त्या संबंधीत तपास एजन्सीने करावं,’ असा खुलासा पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे.
मुंबईचा पालकमंत्री म्हणून मला अनेक ठिकाणी बोलावलं जातं, तशाचं प्रकारे या पार्टीत बोलावलं होतं असं वक्तव्य अस्लम शेख यांनी केलं आहे. पण कासिफकडे माझा फोन नंबर आहे की नाही मला माहीत नाही. माझा फोन माझ्या पीएकडे असतो. माझी स्मरणशक्ती सांगते की कासिफनं मला फोन केलेला नाही. माझं त्याच्याशी बोलणं झालेलं नाही असंही अस्लम शेख म्हणाले. पम जिथे जायचंच नाही, त्याबद्दल माहिती घेण्याची गरज वाटत नसल्याचं अस्लम शेख यांनी बोलून दाखवलं.
महाराष्ट्र सरकारला पाडण्याचे आणि बदनाम करण्याचे प्रयत्न सुरुवातीपासूनच चालू आहेत. मला या गोष्टीचं दु:ख आहे की, गुजरातमध्ये २० हजार कोटींपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त करण्यात आले, मात्र याची चर्चाच नाही मात्र, आर्यन केसबाबत मात्र गाजावाजा झाल्याचं अस्लम शेख म्हणाले. तसेच ‘सरकार वा मंत्र्यांविरोधात पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे आणि खुलेआम बोलावं’, असं आव्हान अस्लम शेख यांनी आरोप करणाऱ्यांना केलं आहे. मी स्वत: पोर्ट मिनीस्टर आहे. मला जर या ड्रग्ज पार्टीची माहिती असती मी स्वत: पोलिसांना याबाबत माहिती दिली असती. क्रुझला माझ्या विभागानं परवानगी दिलेली नव्हती. ते राज्य सरकारचं काम नसून त्याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळत असल्याचं शेख म्हणाले.