नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान मोदींची घोषणा ‘मैं देश नहीं बिकने दूंगा’ नव्हे, ‘मैं देश नहीं बचने दूंगा’ मात्र, आता उद्योग पतींच्या प्रेमाखात त्यांनी आपली घोषणा बदलली आहे. असा निशाणा आम आदमी पक्षाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी नरेंद्र मोदींवर साधला आहे.
केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर, आम आदमी पक्षाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा होती, की “देश नहीं बिकने दूंगा.” मात्र, आता उद्योग पतींच्या प्रेमाखात त्यांनी आपली घोषणा बदलली आहे. याच बरोबर त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. तसेच आप खासदार संजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत सवाल केला आहे, की त्यांच्या सरकारने अर्थसंकल्प नेमका कुणासाठी तयार केला? चार भांडवलदारांसाठी तयार केला. त्यांना फायदा करून देण्यासाठी आणि संपूर्ण देश त्यांनाच विकण्यासाठी तयार केलाय. देशाच्या जनतेला समजले आहे, की मोदी देशाचे नाही तर केवळ चार भांडवलदार मित्रांचेच पंतप्रधान आहेत. त्यांच्याच हातात देशाची संपत्ती गहाण ठेऊन सर्व काही विकण्याचा विचार आहे. एक ‘सपूत’ असतो, जो आपल्या कुटुंबाची संपत्ती वाढतो, तर एक ‘कपूत’ असतो जो कुटुंबाची संपत्ती विकतो.
ट्विटरवर पोस्ट केलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये संजय सिंह यांनी म्हटले आहे, पीएम मोदी एकदा म्हणाले होते की, ‘ये देश नहीं बिकने दूंगा. मैं देश नहीं मिटने दूंगा, मात्र, अर्थसंकल्प पाहिल्यानंतर चार ओळी सुचतात. पंतप्रधानांची घोषणा बदली आहे. ‘ये देश नहीं बचने दूंगा. ये खेत-खलिहान नहीं बचने दूंगा, किसान नहीं बचने दूंगा.नौजवान नहीं बचने दूंगा, ये देश नहीं बचने दूंगा. ये देश नहीं बचने दूंगा, व्यापार नहीं बचने दूंगा. कर्मचारी नहीं बचने दूंगा, बैंक नहीं बचने दूंगा. LIC नहीं बचने दूंगा, ये देश नहीं बचने दूंगा. ये देश नहीं बचने दूंगा, ये सेल नहीं बचने दूंगा. ये रेल नहीं बचने दूंगा, BPCL नहीं बचने दूंगा. एयरपोर्ट नहीं बचने दूंगा, ये देश नहीं बचने दूंगा.ये देश नहीं बचने दूंगा.’