TheClearNews.Com
Sunday, December 14, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यापीठ व एसीटीचा विद्यार्थी हितासाठी आदर्श उपक्रम : डॉ.बाळू पी.कापडणीस

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत रसायनशास्त्र प्रशाळा विभाग व असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्सने “प्रॅक्टिसिंग नेट-सेट एक्झामिनेशन इन केमिकल सायन्सेस” कार्यशाळा हा व्यापक विद्यार्थी हितासाठी राबवलेला आदर्श उपक्रम आहे, असे प्रतिपादन सेट परीक्षा समन्वयक प्रा‌.डॉ.बाळू पी.कापडणीस यांनी केले.

दि.१९ जुलै २०२१ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत रसायनशास्त्र प्रशाळा विभाग व असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स (ACT) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना नेट/सेट परीक्षांच्या तयारी साठी लागणारे मार्गदर्शन करण्यासाठी “प्रॅक्टिसिंग नेट-सेट एक्झामिनेशन इन केमिकल सायन्सेस” या ऑनलाइन राष्ट्रीय कार्य शाळेचे उदघाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.डॉ.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली सेट परीक्षा, पुणे समन्वयक प्रा‌.डॉ.बाळू पी.कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी डॉकापडणीस बोलत होते. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.बी.व्ही.पवार, कुलसचिव डॉ.एस.आर. भादलीकर, माजी प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी.माहुलीकर रसायनशास्त्र प्रशाळा विभागाचे संचालक प्रा.डॉ.डी. एच.मोरे प्रमुख आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाइन उपस्थित होते तर देशभारतून ९१८ विद्यार्थी याप्रसंगी सहभाग नोंदवला.

READ ALSO

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मानवविकास कार्यक्रमांतर्गत वाहतुकीसाठी बसेस उपलब्ध करून द्याव्यात ; आ. एकनाथराव खडसेंची मागणी

कार्यक्रमाचे उदघाटक माननीय प्रा.डॉ.बाळू पी.कापडणीस यांनी सदर ऑनलाइन राष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन झाले असे घोषित करुन मार्गदर्शन करतांना नेट /सेट परीक्षा यामध्ये काय फरक आहे, अभ्यासक्रम, पायाभूत मूल्ये काय आहे, पात्रता, सेट परीक्षेचे स्वरूप, नेट परीक्षेचे स्वरूप, अटी आणि निकालाचे निकष नमूद करतांना या कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त करून या राष्ट्रीय कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना विद्यापीठाचे मा.कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांनी असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्सने विद्यार्थ्यांना नेट-सेट परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यासाठी नावीन्यपूर्ण अशा राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त करुन सहभागींना या कार्यशाळेचे कसे फायदे होतील याबद्दल मार्गदर्शन केले आणि भविष्यात अशा कार्यक्रमाचे नियोजन परिणामकारक कसे करता येईल याबद्दल विश्वास व्यक्त केला. त्यांनी संयोजन समिती, तंत्रज्ञ समिती आणि एसिटी सदस्यांचे कौतुक केले.

विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू, एसीटीचे आधारस्तंभ आणि कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. पी.पी.माहुलीकर सर यांनी असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्सचे महत्व, कार्य, उद्दिष्टे, कॉन्फरन्सचे संयोजन, संशोधन शिष्यवृत्ती साठी भविष्यात केली जाणारी व्यवस्था, सहा महिन्याने पुन्हा राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले जाईल आणि या कार्यशाळेसाठी शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार यांनी नेट-सेट परीक्षेबाबत माहिती देताना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, वेळेचे आयोजन, स्टडी मटेरियल, फायदे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका सोडवणे हे परीक्षेच्या अगोदर करणे गरजेचे आहे आणि परीक्षा देतांना आपला दृष्टिकोन हा सकारात्मक आणि उत्साहीअसला पाहिजे असे त्यांनी नमूद केले.

असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर्स चे अध्यक्ष प्रा.डॉ.एस. एस.राजपूत यांनी एसीटीचे महत्व, विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम भविष्यातही आयोजित करत राहू असे स्पष्ट केले. त्यानंतर रसायानशास्त्र प्रशाळा विभागाचे संचालक डॉ. डी.एच.मोरे सरांनी विद्यापीठातील प्रशाळा बद्दल माहिती वर्णित केली.

या राष्ट्रीय कार्यशाळेत खालील विषय तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

Date:19/7-Prof. Nandkishor N.Karade, Nagpur University (Conformation & Reactivity), Date:20/7- Dr.Vishnu A. Adole, MGV’s ASC College, Manmad (Inorganic Spectroscopy & Coordination Chemistry), Dr.Bapu Shingate , Dr. BAMU , Aurangabad (Multistep Organic Synthesis), Date:21/7- Dr.Prashant Koli. ACS College , Satana ( Bioinorganic Chemistry ), 22/7- Dr. Sushilkumar Dhanmane, Fergusson College, Pune (Organic Spectroscopy), Prof. Dr.Dipak S. Dalal, KBC NMU, Jalgaon (Pericyclic Reactions) 23/7- Dr.Emmanuel Joy, Karunya University, Coimbatore, Tamilbadu( Organic Stereochemistry), Mr. Kishor M.Borse , SSVPS College, Dhule (Tricks for the Preparation of NET / SET ), Date: 24/7- Dr.Harichandra A. Parbat, Wilson College , Mumbai (Preparation Physical Chemistry Syllabus for CSIR NET & Basic Principles of Quantum Mechanics), Mr.Vivek C.Badgujar, Pratap College, Amalner (Palladium Catalyzed Reactions in Organic Synthesis), Date: 25/7- Prof.Dr.Gajanan S. Rashinkar, Shivaji University, Kolhapur (Preparation of NET / SET Examination)

उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक करतांना या राष्ट्रीय कार्यशाळेचे समन्वयक डॉ. दीपक एस.दलाल यांनी सदर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन, प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांना कसे फायदेशीर असेल याविषयी माहिती दिली. कार्यशाळेचे सुत्रसंचालन सहसमन्वयक प्रा. के.एम.बोरसे यांनी तर एसीटीचे सचिव डॉ. गुणवंत सोनवणे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ACT चे उपाध्यक्ष प्रा.ए.एम.नेमाडे, उपाध्यक्ष डॉ.एम.के.पटेल, एम.टी.चौधरी, डॉ.आर.व्ही.पाटील, डॉ.सी.व्ही.नांद्रे, डॉ.एच.ए.महाजन, एसीटीचे प्रसिध्दी विभाग प्रमुख डॉ.पी.एस.गिरासे,डॉ.प्रियांका सिसोदे, डॉ.भरत.एन.पाटील व डॉ.मनोहर पाटील यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

२४ वा अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ९, १०, ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार

December 13, 2025
जळगाव

जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मानवविकास कार्यक्रमांतर्गत वाहतुकीसाठी बसेस उपलब्ध करून द्याव्यात ; आ. एकनाथराव खडसेंची मागणी

December 13, 2025
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
गुन्हे

तोतया पोलीस अधिकाऱ्याने वृद्धाला ८० लाखांना गंडवले !

December 13, 2025
जळगाव

कोरोना काळात उभारलेले ऑक्सिजन प्लांट भाडेतत्त्वावर देऊन कार्यान्वित करावेत ; आ. एकनाथराव खडसेंची विधानसभेत मागणी

December 13, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
Next Post

कोविडच्या अनुषंगाने दक्षता व आवश्‍यक उपचाराबाबत आरोग्य यंत्रणेने सजग रहावे : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्यावसायिकाला १९ लाखांचा गंडा ; जळगावात उत्तरप्रदेशातील चौघांविरुद्ध गुन्हा !

September 26, 2024

“स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना” राबविणार : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

May 19, 2021

शेतातून घरी परतणाऱ्या तरुणासोबत घडलं भयंकर ; गिरणा नदीत बुडाल्याने मृत्यू

October 4, 2024

खळबळजनक : भुसावळात रेल्वे कर्मचार्‍याकडून वयोवृद्ध आईसह पत्नीचा निर्घृण खून !

May 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group