साकळी ता. यावल (प्रतिनिधी) येथील महात्मा फुले ब्रिगेडचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष रवींद्र पितांबर महाजन यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. भुवनेश्वरी आणि रतन दौलत महाजन राहणार कुंजर ता. चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचे द्वितीय सुपुत्र चि. भाऊसाहेब यांचा विवाह दिनांक २८/११/२०२० शनिवार रोजी सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला. या सत्यशोधक विवाह सोहळ्याचे प्रास्ताविक सागर योगराज महाजन यांनी केले.
सत्यशोधक विवाह विधी सत्यशोधक विचार मंचाचे संस्थापक तथा महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच प्रदेश कार्याध्यक्ष भगवान शामराव रोकडे आणि समता परिषदेचे तालुका अध्यक्ष कैलास जाधव तसेच एरंडोल येथील शिवदास जगन्नाथ माळी यांनी काम पहिले. तसेच या नव दम्पत्यास मुळनिवासी बळीराजा यांचा प्रतिमा व इतर काही पुस्तकं भेट देऊन वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. या विवाह सोहळ्यास आजी-माजी नगरसेवक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी व बहुसंख्य बहुजन समाज बंधू-भगिनी उपस्थित होते. सत्यशोधक विवाह सोहळा मुलीकडे एरंडोल येथे करण्यात आला होता. या सत्यशोधक विवाह सोहळ्यात वधू-वर यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले या विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांचे वेश परिधान केल्यामुळे आलेल्या वर्हाडी मंडळीचे लक्ष वेधून घेतले. कोणत्याही प्रकारचा मान पाण केला नाही ठराविक मंडळींना भेटी तसेच आलेले स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांनी शाल देऊन सत्कार केला नाही. सर्व मंडळी आपल्यासाठी सारखेच तोलामोलाचे आहेत. लग्नपत्रिका वाटण्यापेक्षा मोबाईल वर व्हाट्सअप, पोस्ट खाते व कुरियर उपलब्ध असतांना स्वतः घरपोच जाऊन पत्रिका वाटणे ही पद्धत बंद झाली पाहिजे. घरोघरी गावोगावी पत्रिका वाटताना खूपदमछा होते दुर्दैवाने अपघात सुद्धा होतात. परंतु ते आमच्या घरी स्वतः आले होते आपण नाही गेलो तर ते नाराज होतील लग्नाला येणार नाहीत. अशी भावना दूर झाली पाहिजे घरी पत्रिका द्यायला या असा आग्रह धरू नये जुन्या अनिष्ट रूढी परंपरा बद्दल बदलल्या पाहिजेत. या गोष्टी अनुसरून आपण ह्या सत्यशोधक विवाहात कोणत्याही प्रकारच्या पत्रिका न टाकता सर्व आमंत्रणे व्हाट्सअप व वैयक्तिक फोन करून द्यावी असे मोलाचे मार्गदर्शन आलेल्या मान्यवरांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.
सत्यशोधक विवाह सोहळ्याचे आयोजन करून हा आदर्श एरंडोलच्या वैराळे महाजन परिवाराने घालून दिला. त्यामुळे महाजन परिवाराचे एरंडोल तालुक्यात सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे. या सत्यशोधक विवाह सोहळ्यात नगरअध्यक्ष रमेश परदेशी, उपनगराध्यक्ष योगेश महाजन, माजी तहसीलदार अरुण माळी, अतुल महाजन, गजानन महाजन, फुले ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी महाजन, शीतल महाजन, भिकन महाजन, संगीता महाजन, कुणाल महाजन प्रमोद महाजन, रुपेश महाजन, हर्षल महाजन महात्मा फुले ब्रिगेडचे पदाधिकारी, महात्मा जोतिबा फुले युवा मंचचे पदाधिकारी, बालाजी मढी, नागोबा मढी, देशमुख मढी, महात्मा फुले मित्र मंडळ एरंडोल यांनी सहकार्य केले. व मोठ्या संख्येने सर्व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.