जळगाव (प्रतिनिधी) येथील इकरा एज्युकेशन सोसायटी आणि इकरा संचलित संस्थांतर्फे मृतांसाठी “शोकसभा”चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेमध्ये सर्व मृतांना श्रद्धांजली वाहून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
मौलाना अब्दुल अहद मिली यांनी पवित्र कुराण पठण करून सत्राची सुरूवात केली. डॉ. सय्यद शुजात अली साहिब यांनी कार्यक्रमाची उद्दिष्ट व प्रस्तावना सादर केली. सुत्र संचालन प्रा. मुजम्मिल काजी साहिब यांनी पार पाडले. मृतांमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सेक्रेटरी मौलाना मुहम्मद वली रहमानी, मौलाना सोहेब कासमी, सदस्य मुंब्रा मुंबई फारूक आझमी, माजी प्राचार्य अँग्लो उर्दू स्कूल, जळगाव, रफी अहमद रफी, औरंगाबाद, शकील अहमद पत्रकार मुंबई, डॉ. अरशद साहिब चोपडा, अनिस पटेल साहिब इकरा बी.एड कॉलेज, शकील शेख मेहबूब इकरा थीम कॉलेज, तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे माजी कुलगुरू डॉ. मेश्राम, यांचे ही अल्पशा आजाराने निधन झाले त्यांना ही श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रा. सोहेल अमीर साहिब यांनी मृतांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, मृत्यू हे अटळ आहे, ज्यापासून कोणी ही वंचित राहू शकत नाही. मौलाना अब्दुल अहद मिल्ली साहिब यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, मनुष्य यांनी वासनांना चिरडणारी गोष्ट लक्षात ठेवावी, आणि ती गोष्ट म्हणजे मृत्यू. मुफ्ती मुहम्मद हारून नदवी साहिब म्हणाले की, प्रत्येक मनुष्याला मृत्यूचाचा स्वाद घ्यावा लागेल, अगदी त्या काळातील महान विद्वान, संत आणि संदेष्ट्यांनाही या जगाला सोडाव लागल. डॉ. इकबाल शाह म्हणाले की, सर्व मृतांचे या जगात त्यांचे स्थान होते आणि या मृतांच्या ज्या चांगल्या सवयी आहेत ते आपण अंगीकारल्या पाहिजेत.
अलहाज अब्दुल गफ्फार मलिक साहिब म्हणाले की, मृतांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले. अल्लाह मृतांचे आत्म्यास चीर शांति लाभो, अमीन. अध्यक्षीय भाषण करताना डॉ. अब्दुल करीम सालार साहिब म्हणाले की, मृतांच्या चांगल्या सवई व चांगल्या हालचाली जिवंत ठेवणे हाच खरा शोक संदेश असेल. आपण जगात चांगली कामे केली पाहिजेत, जेणेकरून मृत्यूनंतरही लोकांनी आपल्या मनात आदर ठेवला पाहिजे.
सर्व मृतांसाठी मौलाना मुफ्ती मुहम्मद हारून नदवी यांनी प्रार्थनेसह सत्राची सांगता केली. शोकसभेत जळगावच्या लेखक, कवी, विद्वान आणि साहित्यिक व्यक्ती, इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व संस्था प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.