धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी बु. येथील एका बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधम आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी म्गणी आज अन्याय अत्याचार निर्मुलन समिती व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने धरणगाव सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांना आज एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, अन्याय अत्याचार निर्मुलन समिती जिल्हा अध्यक्ष सुचित्रा महाजन,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्षा कल्पना महाजन यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
निवेदनात म्हटले आहे की, टेरु जमादार बारेला (वय २५, रा. मध्यप्रदेश) या नराधमांने ८ ते १० दिवसांपुर्वी पिडीतीचे आई वडील शेतात कामाला गेले असतांना अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना समाजाला काळिमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपीला ताबडतोब अटक करून या चिमुरडीला न्याय द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातून जोर धरू लागली आहे. महिला गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय, साकेगाव ता. भुसावळ येथे जाऊन पिडीत मुलीची भेट घेतली असता समजले की, तिच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार झालेला आहे. म्हणून अन्याय अत्याचार निर्मुलन समिती व शिवसेना महिला आघाडीने लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, सदर आरोपीवर आयपीसी कलम ३७६ सोबत पोस्को कायदा लावण्यात यावा. तसेच हा खटला जलद गती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवुन या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा व्हावी व पिडीत मुलीला न्याय मिळावा. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, अन्याय अत्याचार निर्मुलन समिती जिल्हा अध्यक्ष सुचित्रा महाजन,लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्षा कल्पना महाजन, नगरसेवक विलास महाजन, अन्याय अत्याचार निर्मुलन समिती चा उपाध्यक्ष मनिषा पाटील, सचिव पुष्पाताई पाटील, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, सचिव हर्षा ढाके, पाटील, शुभम पाटील, रोहण महाजन, विलास पवार उपस्थित होते.