भुसावळ (प्रतिनिधी) भोपाळ विभागातील बुधणी-बरखेडा रेल्वे स्थानका दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनच्या नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या २४ रेल्वे एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच आठ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
या गाड्या झाल्यात रद्द !
लोकमान्य टिळक टर्मिनस- राणी कमलापती एक्सप्रेस, राणी कमलापती-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस, जयपूर-हैदराबाद एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर एक्सप्रेस, गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-आग्रा कँट एक्सप्रेस, आग्रा कॅट-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, अहमदाबाद- बरौनी एक्स्प्रेस, बरौनी-अहमदाबाद एक्सप्रेस, अहमदाबाद-आसनसोल एक्स्प्रेस, आसनसोल-अहमदाबाद एक्स्प्रेस, पुणे-गोरखपूर एक्स्प्रेस, गोरखपूर-पुणे एक्स्प्रेस, दादर-बालिया विशेष प्रवास, बालिया-दादर विशेष एक्स्प्रेस, दादर-गोरखपूर विशेष एक्स्प्रेस, गोरखपूर-दादर विशेष एक्स्प्रेस, हैदराबाद-हिसार एक्सप्रेस, हिसार – हैदराबाद एक्स्प्रेस, गोरखपूर- पनवेल एक्सप्रेस, पनवेल-गोरखपूर एक्सप्रेस, विरांगना लक्ष्मीबाई झाँसी-पुणे एक्स्प्रेस, पुणे-विरांगना लक्ष्मीबाई झाँसी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या गाड्यांच्या मार्गात झाला बदल !
लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी कामायनी एक्सप्रेस, पुणे-लखनौ एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर, बलसाड- कानपूर एक्स्प्रेस, इटारसी, जबलपूर, कटनीमार्गे धावणार आहे. वाराणसी- लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्स्प्रेस, लखनौ-पुणे एक्सप्रेस, गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, कानपूर-बलसाड एक्सप्रेस कटनी, जबलपूर, इटारसीमार्गे धावणार आहे.