भुसावळ (प्रतिनिधी) मुंबई रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी रेल्वेतर्फे ब्लॉक घेण्यात आला आहे. शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस १८ गाड्या रद्द करण्यात आल्या असून १९ गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. यात सेवाग्राम एक्स्प्रेस ही ३१ मे व १ जून असे २ दिवस नाशिकला तर विदर्भ एक्स्प्रेस ही गाडी ही दादरला याच दोन दिवशी टर्मिनेट करण्यात येणार आहे.
मुंबईच्या ब्लॉकमुळे ३१ मे रोजी अमरावती- मुंबई एक्स्प्रेस, नागपूर – मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, हावडा- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर १ जूनला अप मार्गावरील भुसावळ विभागातील पंचवटी एक्स्प्रेस, धुळे- मुंबई एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी मुंबई व जबलपूर- मुंबई गरीब रथ एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. डाऊन मार्गावर १ जूनला मुंबई- साईनगर वंदेभारत एक्स्प्रेस, मुंबई- धुळे एक्स्प्रेस, मुंबई- मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई अमरावती एक्स्प्रेस, मुंबई नागपूर दुरांतो एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
२ जूनला अप मार्गावरील मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, धुळे- मुंबई एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर २ जूनला डाऊन मार्गावरील मुंबई- शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई – धुळे एक्स्प्रेस, मुंबई- जबलपूर गरीब रथ, मुंबई- हावडा एक्स्प्रेस, या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. शॉर्ट टर्मिनेट दादर स्थानकावर ३० व ३१ मे रोजी अमृतसर- मुंबई पठाणकोट एक्स्प्रेस व हावडा मुंबई मेल, ३१ मे व १ जूनला विदर्भ एक्स्प्रेस, पंजाब मेल, ३० व ३१ मे रोजी, १ जून रोजी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, ३० मे रोजी हावडा- मुंबई मेल, ३१ मे रोजी हावडा- मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, ३० मे रोजी हावडा- मुंबई मेल, ३१ मे रोजी पुष्पक एक्स्प्रेस व हावडा मुंबई एक्स्प्रेस या गाड्या शार्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.