भुसावळ (प्रतिनिधी) झाशी रेल्वेस्थानकात दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे भुसावळ विभागातून जाणाऱ्या जवळपास आठ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गाडी क्र. ०१९२१ पुणे- वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन ही १४,२१,२८ रोजीची साप्ताहिक एक्सप्रेस रद्द, गाडी क्र. ०१९२२ लक्ष्मीबाई झाशी जंक्शन पुणे ही १३,२०,२७ रोजीची एक्सप्रेस रद्द गाडी क्र. १२१७१ लोकमान्य टिळक टर्मिनस हरिद्वार जंक्शन द्वि- साप्ताहिक एक्सप्रेस दर सोमवार आणि गुरुवारी असते. ती ११, १४, १८,२१, २५, २८ सप्टेंबर रोजी तर गाडी क्र. १२१७२ हरिद्वार जंक्शन लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि- साप्ताहिक एक्सप्रेस दर मंगळवार आणि शुक्रवारी असते. ती रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्र. २२४५६ कालका साईनगर शिर्डी दर गुरुवार आणि रविवारी असणारी द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस १४, १७, २१, २४, २८ सप्टेंबर रोजी तर गाडी क्र. २२४५५ साईनगर शिर्डी- कालका द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस दर मंगळवार, शनिवार असते. ही गाडी १६, १९, २३, २६, ३० सप्टेंबर रोजी रद्द असेल.
गाडी क्र. ११४०६ हजरत निझामुद्दीन-भुसावळ जंक्शन गोंडवाना एक्सप्रेस दर शुक्रवार आणि रविवार असते. ती आता १५, १७, २२, २४, २९ सप्टेंबर रोजी तर गाडी क्र. १२४०५ भुसावळ- हजरत निझामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस दर मंगळवार व रविवार धावते. ती गाडी १७, १९, २४, २६ सप्टेंबर तथा १ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली आहे.
विरांगणा लक्ष्मीबाई झाशी जंक्शन रेल्वे स्टेशनवर 35 दिवसांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 04 (600 मीटर लांबी) चा धुण्यायोग्य अॅप्रनच्या दुरुस्तीच्या कामासाठी उत्तर मध्य रेल्वेच्या विभागाला रेल्वे बोर्डाने ब्लॉक घेण्यास मंजुरी दिली आहे मात्र यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.