गांधीनगर (वृत्तसंस्था) गुजरातमधील बडोद्यात ट्रक आणि कंटनेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच परिवारातील १० लोकांचा मृत्यू झालाय. तर या अपघातात तब्बल १७ प्रवासी जखमी झाले आहेत. एका लग्नसमारंभातून परत येत असतांना बडोद्यातील वाघोडीया क्रॉसिंग हायवेजवळ ही घटना घडली.
ट्रक आणि कंटनेरमध्ये टक्कर झाल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. ही धडक ऐवढी भीषण होती की यामध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर जखमींना तातडीने वडोदरा इथल्या एसएसजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातामधील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे . एका लग्नसमारंभातून ते परत येत होते. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे. मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांनी अपघाताची माहिती देण्यात येत आहे.