बुलडाणा (प्रतिनिधी) बुलडाण्यात दत्तक घेतलेल्या पुत्रानेच संपत्तीसाठी बापाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, सोपान दळभंजन या दत्तकपुत्राने वडिल निवृत्ती दळभंजन यांना शेतात गळा आवळून ठार मारल्याचे उघडकीस आले आहे. अकोला वैद्यकीय महाविद्यालयाने एका महिन्यानंतर दिलेल्या फॉरेन्सिक अहवालातून दळभंजन यांचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे समोर आले. या अहवालानंतर बुलडाणा जिल्ह्यातील सगोडा गावात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. निवृत्ती दळभंजन यांनी सोपान दळभंजन या पुतण्याला मागील वर्षी दत्तक घेतले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील सगोडा गावातील शेतकरी निवृत्ती पुंडलीक दळभंजन यांना आरोपी सोपान दळभंजन याने शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी सोपान याने वडिलांना सर्पदंश झाल्याने त्यांचा हार्ट अटॅक आल्याचे सांगितले होते. डॉक्टरांनी यावेळी तपासणी केल्यानंतर निवृत्ती दळभंजन हे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मरण पावल्याचे सांगितले. यांनतर शवविच्छेदन झाल्यानंतर दळभंजन यांचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते.
अकोला वैद्यकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक तज्ञांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. या अहवालात मृत दळभंजन यांना दोरीच्या साहायाने ठार मारले असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसंनी दत्तकपुत्राला ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली असता आपणच संपत्तीच्या वादातून बापाचा खून केल्याची कबुली त्याने दिली.
















