चोपडा (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तालुकाध्यक्ष राजेंद्र गंगाधर पाटील यांच्यासह एक मोठी फळी शिवसेनेत दाखल होऊन शिवबंध हातावर बांधल्याने तालुक्यात राजकीय भूकंप झाला आहे. एक नव्हे दोन नव्हे तब्बल डझनभर तालुका व युवक पदाधिकाऱ्यांनी सेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.
काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या निष्पाप, निस्वार्थी व निष्ठावान पदाधिकाऱ्यांची पक्षात गळचेपी होण्याचे प्रमाण वाढल्याने स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी अण्णासाहेबांचा हात सर्वसामान्य माणसाचा हात असल्याचे मानत सेनेत उडी घेतली आहे. शिवसेनेचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गंगाधर पाटील, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मनोज युवराज पाटील,रा.कॉ.उपाध्यक्ष राजेंद्र कोळी (कठोरा),युवक उपाध्यक्ष किरण पाटील, महिला तालुकाध्यक्ष सौ.सुनंदाबाई ईश्वर पाटील, उपाध्यक्ष संदीप कोळी,सत्रासेनचे माजी सरपंच रमेश बापू ठाकुर,दुध डेअरी संघाचे चेअरमन जगदीश निंबा पाटील आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकत सेनेत प्रवेश केला आहे.
यावेळी कृउबा समिती सभापती नरेंद्र पाटील, संचालक विजय पाटील, संचालक रावसाहेब पाटील, संचालक गोपाल पाटील, माजी पं.स.सभापती एम.व्ही.पाटीलसर, माजी नगरसेवक राजेंद्र जयस्वाल, युवा सेनाध्यक्ष गोपाल चौधरी, सेना पदाधिकारी सुकलाल कोळी,किरण करंदीकर, नितीन पाटील, तुषार पाटील, प्रल्हाद पावरा,नानाभाऊ वेले, समन्वय समिती सदस्य कैलास बाविस्कर, विकास पाटील,नंदू गवळी, हातेड सरपंच ज्ञानेश्वर अहिरे, कुणाल पाटील,संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य संजीव शिरसाठ, चंद्रशेखर साळूंके आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान राष्ट्रवादी पक्षात गेल्या २५ वर्षापासून निष्पाप, निस्वार्थी व निडरपणे पक्ष कार्यात झोकून देणाऱ्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांची गळचेपी करण्याचा प्रकार वाढीस लागल्याने अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे.