अमळनेर (प्रतिनिधी) : देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये वेशभूषा स्पर्धा,पथनाट्य स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात घेण्यात आल्या. यावेळी इयत्ता आठवीतील रागिनी पाटील या विद्यार्थिनीने देशाच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आपलं मनोगत व्यक्त केलं तर इयत्ता नववीतील भाग्यश्री पाटील या विद्यार्थिनीने राष्ट्रमाता जिजाऊ यांची भूमिका साकारत आपलं मनोगत व्यक्त केलं.
इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी राजश्री पाटील, प्रणाली पाटील, हर्षदा पाटील,आकांक्षा पाटील,भाग्यश्री पाटील व आठवीतील रागिनी पाटील यांनी “बेटी बचाओ,बेटी पढाओ” हे उत्कृष्ट पथनाट्य सादर केले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन शिक्षक आय .आर महाजन, एस .के महाजन, एच ओ.माळी,अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय आर महाजन यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी केले.