धरणगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात, ७५ चिमुकल्यांनी विविध विभूतींची वेशभूषा साकारली.
पालक अविनाश सोनवणे व अनिता सोनवणे यांच्याहस्ते विभूतींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ख्वाजा नाईक, बिरसा मुंडा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, राजश्री शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले, डॉ.हेडगेवार यांची वेशभूषा साकारली. शाळेपासून शिवाजी महाराज पुतळा, नेहरू चौक, रामदेवजी बाबानगरमार्गे घोषणा देत रॅली काढण्यात आली होती. मुख्याध्यापक जीवन पाटील, मुख्याध्यापक एस.एस.पाटील यांनी कौतूक केले. कैलास माळी यांनी नियोजन केले. पल्लवी मोरे, के.के.चव्हाण यांनी मेहनत घेतली.















