धरणगाव प्रतिनिधी – शहरात कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हजून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाची सुरवात धरणगाव शहरातील प्रथम नागरीक लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या घरापासून (दि.१२ सप्टेंबर २०२०) पासून करण्यात आली आहे.
“माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा कालावधी दि.१० सप्टेंबर २०२० ते २५ ऑक्टोबर, २०२० राहील, या कालावधीत धरणगाव शहरातील ५० पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचे सखोल आरोग्य परीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी धरणगाव शहरात एकूण १२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पथकामार्फत शहरातील प्रत्येक घरी भेट देऊन ५० पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींची प्राथमिक आरोग्य तपासणी करतील. यासह मधूमेह, ह्रदयविकार, किडणी आजार, लठ्ठपणा यासारख्या महत्वाच्या comported condition असणाऱ्या व्यक्ती अशा activities करण्यात येतील. मोहीम कालावधीमध्ये प्रत्येक व्यक्तीस आरोग्य व कोविड प्रतिबंधाचे संदेश देण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक घरातील सर्व सदस्याची तपासणी करण्यात येईल. कोरोना या साथरोगाचे लवकर निदान झाल्यास रुग्ण औषधोपचाराने बरा होतो . लक्षणाकडे व आजाराकडे दुर्लक्ष केल्यास रोग बळावतो व रुग्ण गंभीर अवस्थेत जावून रुग्ण दगावण्याची शक्यता असते. धरणगाव शहरातील सर्व नागरिकाना, लोकनियुक्त नगराध्यक्ष , उपविभागीय दंडाधिकारी , तहसीलदार , मुख्याधिकारी, सन्माननीय नगरसेवक , नगरसेविका यांच्याकडून आवाहन करण्यात येते की, आपल्या घरी भेट देणाऱ्या पथकाना सहकार्य करून त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांची परिपूर्ण माहिती द्यावी व आपल्या कुटुंबाचा कोरोना या साथरोगापासून बचाव करावा.