धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील ग्रामदैवत मरीआईच्या नवीन मंदिराचे बांधकाम नुकतेच पूर्णत्वास आले होते. रविवारी सायंकाळी मरीआई मंदिराचे कलश बसविण्यात आला. तसेच मरीआई मंदिराच्या गाभाऱ्यात मरिमातेची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छ्ता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा हस्ते करण्यात आली.
मरी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनेनंतर पालकमंत्र्यांनी विधिवत पूजन करून मरी मातेचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, पप्पू भाऊ भावे, विजय महाजन, भानुदास विसावे, वासुदेव चौधरी, विलास महाजन, वाल्मीक पाटील, पवन महाजन, सोनू महाजन, बालू जाधव, सुरेश महाजन, दिलीप पाटील, राजूअप्पा महाजन, गुलाब बाबा व मरिमाता संस्थान अध्यक्ष व पंच मंडळ जागृती युवक मंडळ अध्यक्ष व पंच मंडळ यांच्यासह असंख्य भाविक भक्त उपस्थित होते.