औरंगाबाद (वृत्तसंस्था) शिक्षणासाठी मुलीने मामाकडे राहण्याचा हट्ट धरल्याचा राग मनात धरत बहिणीने भावाला थेट पोलीस ठाण्यासमोरच धो-धो धुतल्याची घटना औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीसमोर घडली आहे. मात्र, चक्क पोलीस ठाण्यासमोर झालेल्या या फ्रि स्टाईल मुळे पोलीसांची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान, पोलीसांनी हस्तक्षेप करून सर्वांना ताब्यात घेतले आहे.
दहावीत शिकणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या काही महिन्यांपूर्वी बजाजनगर येथे आई रामकौर विलास जाधवकडे राहत होती. मात्र, आईची वागणूक पसंत नसल्याने मुलगी मामाच्या गावी म्हणजे बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील बेलगाव येथे गेली होती. ती मुलगी आपल्या मामाकडे राहून पुढील शिक्षण घेणार होती. त्यासाठी ती टीसी घेण्यासाठी औरंगाबाद शहराजवळील बजाजनगरात आली होती. मात्र, तीला टीसी न देता, तु मामाकडे जाऊ नको. येथेच राहून शिक्षण घे, असा आग्रह आईने धरला. आई रामकौर जाधव हि तिच्या मुलीला आणि स्वतःच्या भावाला याबाबद्दल सांगत असताना त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यात ती मुलगी मामाकडे जाण्यावर ठाम होती.
या वादात मुलीसह आई रामकौर जाधव व मामा नकुस टोणगे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ते पोलीस ठाण्यात आल्यांनतर ही त्यांच्यातील वाद सुरूच होता. हा वाद विकोपाला गेल्याने रामकौर हीने अल्पवयीन मुलीसह भाऊ नकुस टोणगे याला चप्पलेने बेदम चोपले.