जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कुणबी मराता, मराठा- कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम संपुष्टात आले आहे. ३९ लाख अभिलेखे तपासल्यानंतर लाख ५२ हजार कुणबी नोंदी आढळल्या आहेत.
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा विशेष कक्षातर्फे या कामकाजावर देखरेख आहे. नोंदी शोधण्याचे काम १२ शासकीय विभागांमार्फत झाले, यंत्रणांनी सन १९६७ पूर्वीचे ३५ लाख विविध अभिलेखे तपासले. त्यात १ लाख ५२ हजार कुणबी नोंदी आढळल्या. जन्म-मृत्यू नोंद रजिस्टर (गाव नमुना १४), महसूलचे क-पत्रक, शैक्षणिक अभिलेखे प्रवेश निर्गम नोंदवही, जनरल रजिस्टर, भूमी अभिलेखचे पक्का चूक, महापालिका, नगरपालिकांचे शेतवार तक्ता वसूल व आमदनी रजिस्टर, सातबारा उतारा, प्रवेश निर्गम नोंदवही व सह दुय्यम निबंधकांकडील अभिलेखांमध्ये कुणची नोंदी आढळून आल्या आहेत. सर्व नोदी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर गावनिहाय अपलोड केल्या आहेत.