जळगाव (प्रतिनिधी) शहरातील बस स्थानक परिसरातील चोपडा मार्केटमध्ये असलेल्या हॉटेल लयभारीमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर जिल्हापेठ पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. याठिकाणाहून पाच महिलांसह सहा पुरुष व हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
शहरातील नवीन बस स्थानकाशेजारी असलेल्या चोपडा मार्केट परिसरात लयभारी नावाची हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना झाले. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून पंटरद्वारे आत गेले असता, त्या ठिकाणी कुंटणखाना सुरु असल्याचे खात्री होताच पथकाने छापा टाकला.
याठिकाणाहून ५ महिलांसह पाच ते सहा पुरुषांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा देशमुख, पोहेकॉ सलीम तडवी, पोकॉ रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे यांच्या पथकाने केली आहे.