पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील दोनगाव येथे 10 लाखाचे बौद्ध विहार मंजूर झाल्यामुळे दोनगाव येथील समाज बांधवांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नुकताच सत्कार केला.
तालुक्यातील दोनगावसह इतर गावांमध्ये बौद्ध विहार मंजूर करण्यात आले आहे. तसेच आदिवासी भिल्ल समाजाचा मागणी नुसार भगवान एकलव्य यांचे स्मारक तयार करण्यासाठी 51 हजार रुपये देणगी दिली असून समाज बांधवांनी पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा सत्कार केला. या वेळी उपस्थित विधानसभाक्षेत्र प्रमुख संजय पाटील, किशोर राघो पाटील, सुरेश देवराम पाटील, अमोल विजय पाटील, मागासवर्गीय सेनेचे मुकुंदराव नन्नवरे, सचिन दादा पवार, जयसिंग बिर्हाडे, राजु भालेराव, आनंद सैंदाणे, रावसाहेब वानखेडे, निलेश बिर्हाडे, वासुदेव मालचे, सुकदेव मालचे, भागवत मालचे, रविंद्र पवार, आकाश मोरे, विनोद सोनवणे, अमोल पाटील, दुर्योधन सोनवणे यांच्यासह आदी उपस्थित होते.