जळगाव (प्रतिनिधी) क्रेनच्या धक्क्याने झाडे तुटल्याने त्या ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या रामानंद नगर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्सटेबलची कॉलर पकडून धक्काबुक्की करण्यात आली. तसेच तुम्ही मला ओळखत नाही, क्रेन मी जागेवरून हलू देणार नाही, असे म्हणत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी योगेश पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील रामानंद घाटाच्या उतारावर एका क्रेनचे ब्रेक फेल झाल्याने ती झाडावर जाऊन धडकल्याची घटना घडली होती या अपघातात झाडांचे नुकसान झाले होते याठिकाणी योगेश पाटील नामक व्यक्ती क्रेन चालकाशी वाद घालत होते व तेथे गर्दी जमा झाली होती. त्या ठिकाणी चार्ली पेट्रोलिंगचे अंमलदार व रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ संजय सपकाळे हे देखील घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाटील यांना पोलिस ठाण्यात येऊन तक्रार द्या व क्रेनही पोलिस ठाण्यात नेण्याविषयी सांगितले. त्या वेळी पाटील यांनी सपकाळे यांना शिवीगाळ करीत तुम्ही मला ओळखत नाही, सदर क्रेन मी जागेवरून हलू देणार नाही.
झाडांचे झालेले नुकसान मला आत्ताच रोख स्वरुपात पाहिजे असे म्हणत अरेरावी केली व कॉलर पकडून धक्काबुक्की केली. शासकीय कामात . अडथळा आणला म्हणून सपकाळे यांनी . रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून योगेश पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि गोपाल देशमुख करीत आहेत.