जळगाव (प्रतिनिधी) गोकुळ नगर कोळीवाडा पिंप्राळा येथील तरुणीचा दिड वर्षापुर्वीच प्रेम विवाह झाला आहे. याचा राग तेव्हा पासून मामाआनंदा पांडूरंग जाधव याच्या मनात होता. तसेच कांचन यांच्या माहेरच्या मंडळींना विवाहाला विरोध होता. त्यावरुनच कुरापत काढून मंगळवारी संध्याकाळी दिर व सासु दुचाकने जात असतांना त्याना दगड फेकुन मारत वाद घातला. जाब विचारल्यावरुन वादाला सुरुवात होवुन रत्नाबाई सानेवणे यांची पोत व पर्स पळवल्याची तक्रार कांचन सोनवणे यांनी दिली आहे.
कंचन (वय-२३) यांचे सचिन सोनवणे यांच्यासोबत दिडवर्षापुर्वी प्रेम विवाह झाला. मात्र, कांचन यांच्या माहेरच्या मंडळींना विवाहाला विरोध होता. याचा राग तेव्हा पासून तिचे मामाआनंदा पांडूरंग जाधव याच्या मनात होता. त्यावरूनच तिचे मामा आनंदा जाधव यांनी कुरापत काढली. कांचन सोनवणे यांचे दिर राहुल सोनवेण आई रत्नाबाई सानवणे यांना घेवून पिंप्राळ्यातून जात असतांना कुंभार वाड्या जवळ आनंदा जाधव याने दगड मारुन फेकला. तसेच शिवीगाळ करुन तुम्हाला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत हल्ला चढवला. यात रत्नाबाई व राहुल असे दोघे जण किरकोळ जखमी झाले असून कांचन सोनवणे यांच्या तक्रारीवरुन आनंदा जाधव, सुनी बाळू सपकाळे, जिवन सपकाळे (सर्व रा. बौद्ध वाडा पिंप्राळा) यांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक महेंद्र पाटिल करीत आहेत.















