जळगाव (प्रतिनिधी) गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चोरटे दिवसाढवळ्याही घरफोड्या करीत आहेत. तालुक्यातील नंदगाव येथील अज्ञात चोरट्यांने भरदिवसा शेतमजूराचे बंद घरफोडून घरातील सोन्याचे दागीन्यांसह रोकड लंपास केल्याचे उघकीला आले आहे. चोरटयांने एकुण ५० हजार रुपयाचा ऐवज लंपास केला.
अधिक माहिती अशी की, शरद भास्कर धनगर (वय-४८) रा. ग्रामपंचयतीसमोर नंदगाव ता.जि.जळगाव हे शेतमजूर असून आपल्या पत्नीसह शेतात जावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे दुसऱ्यांच्या शेतात जाणासाठी ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घराला कुलूप लावून गेले असताना अज्ञात चोरट्यांने दुपारी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने घरातील २५ हजार रूपयांची रोकड आणि १२ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे टोंगल आणि १२ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे काप असा एकुण ५० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाला चोरू केला. सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे शरद धनगर यांच्या पत्नीच्या लक्षात आले. शनिवारी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता तालुका पोलीस ठाण्यात गाठले. शरद धनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाटील करीत आहे.